हत्या की आत्महत्या? श्रेयसला कुणी मारलं?उलटसुलट चर्चा, घटनेने महाड हादरले

महाड, रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील तांबट अळी परिसरात राहणाऱ्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा बंदुकीतून गोळी सुटल्याने मृत्यू झाला. श्रेयस सुनील नगरकर असे त्याचे नाव असून स्वत:च्याच हातातील बंदुकीची गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु त्याची हत्या की आत्महत्या, याचा तपास पोलीस करत आहेत.

सविस्तर वृत्त असे की, पंधरा वर्षीय श्रेयस शाळा सुटल्यानंतर घरी आला. जेवणानंतर घरात असलेली बंदूक त्याने हातात घेतली. बंदुकीसोबत तो खेळत असताना त्याच्या हातून सुटलेली गोळी डोक्यातून आरपार गेली. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.
Raigad News: बाईक चालवताना कुत्रा आडवा, १८ वर्षीय तरुण उभ्या टँकरला धडकला, नीलने प्राण सोडला

ज्या इमारतीत श्रेयस राहतो, त्याच इमारतीत श्रेयसचे वडील सुनील नगरकर यांचे सोन्याचे दुकान आहे. श्रेयसला शालेय अभ्यासात गती नव्हती, किंबहुना तो शाळेत जायला फारसा उत्सुक नसायचा. घटनेवेळी श्रेयसचे आईवडील दुकानात होते. वरील सदनिकेत मोठा आवाज झाल्याने श्रेयसची काकू धावत सदनिकेत गेली. त्यावेळी श्रेयस रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यांनी लागलीच सदर घटना त्याच्या आई बाबांच्या कानावर घातली.
नात्याला काळिमा फासणारी घटना! पित्याचे पोटच्या मुलीसोबत धक्कादायक कृत्य, रायगड हादरलं

सदर घटना ही खरंच श्रेयसच्या चुकीमुळे घडली की श्रेयसला मारण्यात आले, याबाबत महाड शहरात उलट सुलट चर्चा सुरु आहेत. श्रेयसचा मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे. हत्या की आत्महत्या यासंदर्भाने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. घटनेने महाड शहर हादरले आहे.

दरम्यान, श्रेयसचे वडील सुनील नगरकर यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता. तीच घरात असलेली बंदूक वापरून श्रेयसने टोकाचे पाऊल उचलल्याचेही बोलले जाते आहे.

Source link

mahad youth dies gunshotraigad crime newsRaigad Mahad Crime newsतरुणाचा गोळी लागून मृत्यूरायगड महाड क्राईम न्यूजरायगड महाड तरुण गोळी मागून मृत्यू
Comments (0)
Add Comment