मराठवाड्यातील दौऱ्यात १० ऑगस्ट रोजी लातूर येथे लातूर, धाराशीव, बीड जिल्हा, दिनांक ११ ऑगस्ट रोजी नांदेड येथे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्हा तसेच दिनांक १२ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा काँग्रेसची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे.
दिनांक १३ ऑगस्ट रोजी विदर्भात बुलढाणा येथे बुलढाणा, अकोला आणि वाशिमची, दिनांक १४ ऑगस्ट रोजी अमरावती येथे अमरावती, यवतमाळ जिल्हयाची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.
विधानसभेसाठी महाविकास आघाडीसह महायुतीचे घटक पक्ष कामाला लागले
लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर महाविकास आघाडीसह महायुतीचे घटक पक्ष आता विधानसभा निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. भाजपने जिल्हानिहाय प्रभारींच्या नियुक्त्या करीत, बैठकांवर जोर दिला आहे. तर अजित पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची जनसंवाद यात्रा जिल्ह्यात येऊन गेली. शिवसेना शिंदे गटाकडूनही विधानसभानिहाय प्रभारी आणि निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यातील विधानसभा मतदारसंघाचे दौरे सुरू केले आहेत. काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. त्यापाठोपाठ आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.