आरक्षणाचं वक्तव्य भोवलं, ठिकठिकाणी मराठ्यांनी अडवलं, राज ठाकरेंनी दौरा आटोपता घेतला?

धनाजी चव्हाण, परभणी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मराठवाडा दौरा आटोपता घेतला आहे. १३ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या दौऱ्याचा नियोजित समारोप होणार होता, पण आजच त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून १० ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या दौऱ्याचा समारोप होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्याचबरोबर हिंगोलीचा मुक्काम त्यांनी रद्द केला असून बीड आणि जालना या दोन जिल्ह्याची एकत्र आढावा जालना येथे ते उद्या घेणार आहेत. राज ठाकरे यांनी आपला दौरा आटोपता का घेतला याविषयी मात्र आता मराठवाड्यामध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे. मराठा आंदोलकांचा वाढता रोष की दौऱ्याला मिळत असलेला अल्प प्रतिसाद ही कारणं तर नाहीत ना? अशी देखील चर्चा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा दौरा

येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा आयोजित केला होता. ४ ऑगस्ट रोजी ते सोलापूर येथे आले. ५ ऑगस्ट रोजी धाराशिव येथे मुक्कामी आले. ६ ऑगस्ट रोजी सकाळी धाराशिव जिल्ह्याचा आढावा घेतला आणि सायंकाळी लातूर येथे मुक्कामी गेले. ७ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांनी लातूर जिल्ह्याचा आढावा घेतला आणि सायंकाळी नांदेड येथे मुक्कामी गेले. ८ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांनी नांदेडचा आढावा घेतला आणि दुपारी लगेच हिंगोली गाठले.

त्यांच्या नियोजनानुसार ८ ऑगस्ट रोजी मुक्कामी हिंगोली येथे ते येणार होते पण त्यांनी दुपारी हिंगोली गाठून हिंगोलीचा आढावा घेतला. आता ते आज रात्री परभणी येथे मुक्कामी येणार आहेत. तर उद्या जालना येथे बीड आणि जालना जिल्ह्याचा आढावा घेऊन ते छत्रपती संभाजीनगर येथे मुक्कामी जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर १० ऑगस्ट रोजी ते आपल्या दौऱ्याचा समारोप करणार आहेत. त्यांच्या नियोजनानुसार १३ ऑगस्ट रोजी त्यांचा छत्रपती संभाजीनगर येथे या दौऱ्याचा समारोप अपेक्षित होता. पण तीन दिवस अगोदर त्यांनी आपला दौरा आटोपता घेतला आहे.
Waqf Bill Amendment News: साडे नऊ लाख एकर जमिनीवर मालकी, पण आता धाकधूक वाढली, वक्फ बोर्डाचं विधेयक नेमकं काय आहे?

राज ठाकरेंच्या विधानाला मराठवाड्यात विरोध

राज ठाकरे यांनी आपला दौरा आटोपता का घेतला याविषयी मात्र उलट सुलट चर्चा सुरू आहे. राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आले असतानाच सोलापूर येथे त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना मराठवाड्यामध्ये चांगल्याच रोशाला सामोरे जावे लागले. सोलापूर येथे त्यांनी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र सर्व गोष्टी मुबलक आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात कोणत्याच घटकाला आरक्षणाची गरज नाही असं मत व्यक्त केलं.

एकीकडे मराठवाडा मराठा आरक्षणासाठी पेटलेला असताना राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचा प्रचंड विरोध मराठवाड्यात झाला. धाराशिव येथे राज ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर त्या हॉटेललाच मराठा आंदोलकांनी घेराव घातला. राज ठाकरे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. राज ठाकरे यांना त्या आंदोलकांशी बातचीत करावी लागली. त्याचबरोबर नांदेड येथे देखील राज ठाकरे यांना मराठा आंदोलकांच्या रोशाला सामोरे जावे लागले. आरक्षणावरून मांडलेल्या भूमिकेमुळे राज्यातील आरक्षण वादी लोकांनी देखील त्यांच्या विरोधात चांगलीच आग पाकड केली. त्यामुळे मराठवाड्यावर आलेल्या राज ठाकरे यांना निवडणुकीच्या आढाव्याऐवजी आरक्षणावरुन केलेल्या वक्तव्यामुळे रोशालाच सामोरे जावं लागलं.
Crime News : भिवंडीतील फ्लॅटमध्ये ड्रग्ज बनवण्याचं काम, गुजरात एटीएसची मोठी कारवाई, ८०० कोटींचे ड्रग्ज जप्त

दौऱ्याला प्रतिसाद नाही?

आतापर्यंत राज ठाकरे यांनी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली या जिल्ह्याचा आढावा घेतला आणि आता रात्री परभणीचा आढावा घेणार आहेत. पण धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली या चार जिल्ह्याचा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी आतापर्यंत फक्त लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून संतोष नागरगोजे या एकाच उमेदवाराची घोषणा केली आहे. लातूर येथे भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कवेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. पण धाराशिव नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये मात्र मनावर तेवढा प्रतिसाद मिळाला नाही का असा प्रश्न मात्र उपस्थित होत आहे. आज उद्या आणि परवा ते राहिलेल्या चार जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. १० ऑगस्ट रोजी देश छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्याच्या दौऱ्याचं फलित राज ठाकरे मानतील पण सध्या तरी मात्र त्यांच्या दौऱ्याला प्रतिसाद मिळाला नाही का? असा प्रश्न मात्र मराठवाड्यातील नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे.

राज ठाकरे यांनी तीन दिवस अगोदरच मराठवाड्याचा दौरा आटोपता घेतल्यानंतर हे प्रश्न निर्माण झाले आहेत. आरक्षणावरुन राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य त्यांच्याच अंगलट आले का असा प्रश्न निर्माण होत आहे. तर आत्तापर्यंतच्या दौऱ्यानंतर केवळ एकाच उमेदवाराची घोषणा त्यांनी केल्यामुळे त्यांच्याकडे उमेदवारीसाठी म्हणवा तेवढा प्रतिसाद दिसून येत नाही का असा देखील प्रश्न निर्माण होत आहे.

Source link

raj thackerayraj thackeray assembly electionraj thackeray in marathwadaराज ठाकरे आरक्षण वक्तव्यराज ठाकरे मराठवाडा दौराराज ठाकरेंनी मराठवाडा दौरा आटोपता घेतला
Comments (0)
Add Comment