पवारांच्या विश्वासू नेत्यानेच लोकसभेला घात केला? गुलाबराव पाटलांनी वातावरण तापवलं

निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी भाजपला मदत केल्याचा शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी गौप्यस्पोट केला आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सांगण्यावरून शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांनी रावेर आणि जळगाव या दोन्ही मतदार संघात भाजपला मदत केल्याचा मंत्री गुलाबराव पाटील यांचा आरोप आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची भेट घेतली होती. गुलाबराव देवकर यांनी आम्हाला लोकसभेत मदत केली आहे, अशी माहिती शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. भाजपचे मंगेश चव्हाण यांनी गुलाबराव देवकर यांच्या घेतलेल्या भेटीवर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी देवकर यांच्यावर लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत केल्याचा आरोप केला आहे. तसंच गुलाबराव देवकर यांना मंगेश चव्हाण यांच्या जिल्हा दूध संघाचा चहा खूप आवडतो, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी देवकर यांच्यावर निशाणा साधला.
Crime News : नातवाने आधी आजोबांना संपवलं, नंतर आजीचाही मृतदेह धरणात; असा झाला घटनेचा उलगडा
भाजपचे आमदार मंगेश चव्हाण व शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्यात काही दिवसांपासून कलगीत तुरा रंगला आहे. याच दरम्यान मंगेश चव्हाण यांनी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांची भेट घेतल्याने अनेक राजकीय चर्चा रंगत आहेत. याच विषयावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Raj Thackeray : मराठवाड्यात विधानसभेच्या तयारीसाठी दौरा, पण राज ठाकरेंना आटोपतं घेण्याची वेळ?
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. परमेश्वराच्या साक्षीने आणि बाळासाहेब ठाकरे यांचे शपथ घेऊन मी निष्ठेने लोकसभेत भाजपसाठी काम केलं आहे, त्यामुळे आता भाजपच्या लोकांनी कसं वागावं हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांच्या घेतलेल्या भेटीवरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.

गुलाबराव देवकर यांनी लोकसभेत भाजपला मदत केल्याचा आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्यामुळे आगामी काळात देवकर भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

Source link

gulabrao devkarGulabrao Patiljalgaon newsSharad Pawarगुलाबराव देवकरगुलाबराव पाटीलजळगाव बातमीजळगाव लोकसभा निवडणूकशरद पवार
Comments (0)
Add Comment