Keshavrao Bhosale Theatre Fire : कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न

कोल्हापूर : कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे. आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. आगीचं कारण अद्याप समोर आलं नाही.

कोल्हापूरातील खासबाग मैदानावरील व्यासपीठाच्या लाकडी स्टेजला आग लागल्याचा अंदाज आहे. खासबाग कुस्ती मैदानाच्या बाजूने आग लागल्याचा अंदाज असून त्यानंतर हीच आग केशवराव भोसले नाट्यगृहाला लागत पुढे आली. केशवराव भोसले नाट्यगृह हे संपूर्ण लाकडाचं असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. या आगीत नाट्यगृहातील खुर्च्या जळून खाक झाल्याची माहिती आहे. आगीत मोठं नुकसान झालं आहे. नाट्यगृहात कोणीही नसल्याने कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते आहे.

Source link

keshavrao bhosle theater fireKolhapurKolhapur newsकेशवराव भोसले नाट्यगृहाला आगकोल्हापूर केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आगकोल्हापूर बातमीखासबाग कुस्ती मैदान कोल्हापूर
Comments (0)
Add Comment