चंद्रपूर : वडिलांच्या एका हातात बैलांचे कासरे. दुसरा हात मुलाने घट्ट पकडलेला. बाप-लेक पुरातून मार्ग काढत जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. वडिलांनी मुलाचा हात अधिक घट्ट पकडला. मात्र हाताची पकड सुटली. मुलगा अन् एक बैल पाण्यात वाहून गेला. डोळ्यादेखत मुलगा वाहत असताना त्याला वाचवण्याचा प्रयत्न वडिलांनी केला. मात्र त्यात वडील अपयशी ठरले. चिमूर तालुक्यातील मजरा (बेगडे) या गावात ही मन हे लावून टाकणारी घटना घडली आहे. समीर राणे (वय १९) असं बेपत्ता असलेल्या मुलाचे नाव आहे. वाहून गेलेल्या मुलाचा शोध पोलीस विभाग घेत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रूपर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येणाऱ्या खडसंगी मजरा (बेगडे) येथील वामन राणे, त्यांचा मुलगा समीर राणे हे बापलेक काल बुधवारी सकाळी शेताकडे गेले होते. दुपारी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला होता. शेतातील कामे आटोपून बाप-लेक सांयकाळी असताना सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान बैलजोडीसह घराकडे निघाले. नाल्यावरील असलेल्या बंधाऱ्यावररून जात असताना एका बैलाचा तोल गेला. बैल पाण्यात वाहू लागला. दोन्ही बैलाचे कासारे एकमेकाला बांधून असलेल्याने दुसरा बैल सुद्धा पुरात ओढला जात होता. कासरे सोडवण्यासाठी बाप-लेक पुरात उतरले. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने बैलासह बापलेक पुरात वाहू लागले.
पुरात वाहत असताना वडील एका झाडात अडकले त्यामुळे तो झाडावर चढले आणि वडील वाचले. मुलगा मात्र पुरात वाहत गेला. घटनेची माहिती चिमूर पोलीस स्टेशनला देण्यात आली. चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत मुलाचा शोध घेतला मात्र अद्याप समिरचा मृतदेह मिळालेला नाही. आज पहाटेपासूनच समीरचा शोध घेतला जात आहे.

मारोतीची मन सुन्न करणारी कहाणी
घरची स्थिती बेताची असल्याने नऊ महिन्याच्या गर्भवती आईला मजुरीला जावं लागलं. तिथेच तिला प्रसूतीकळा सुरु झाल्या आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्या परिसरात हनुमानाचे प्राचीन मंदिर असल्याने त्याचे नाव मारोती ठेवलं गेलं. या घटनेला ४२ वर्ष झाली. रविवारी मारोती त्याच परिसरात ट्रॅक्टरने शेतात चिखल करायला गेला. तिथे अपघात झाल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाला आहे. जिथे जन्म झाला तिथेच काळाने त्याच्यावर झडप घातली. मारोती बापू मेक्रतीवार असे मृर्तकाचे नाव आहे. ऐन सणाचा दिवशी मारोतीच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.