एकटं समजू नकोस, तुझे अश्रू दिसतायत, मी इथेच आहे, मातोश्रींच्या शब्दांनी मुख्यमंत्री गहिवरले

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘योद्धा कर्मयोगी’ पुस्तकाचे प्रकाशन काल प्रकाशन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या आवाजातील एक व्हिडिओ दाखवण्यात आला. यातील शब्द कानावर पडताच एकनाथ शिंदे यांना अश्रू अनावर झाले. आईच्या आठवणींनी शिंदे व्यासपीठावरच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

“मी आज जरी या कार्यक्रम स्थळी शरीराने नसले, तरी तू स्वत:ला एकटं समजू नकोस. तुझ्या प्रेमापायी किती मोठमोठी मंडळी आज इथे आली आहेत. मला आज आठवण येते आनंद दिघे साहेबांची. तुझ्या डोळ्यातील अश्रू मला दिसत आहेत, मी इथेच आहे” असे व्हिडिओतील शब्द ऐकताच एकनाथ शिंदे गहिवरले.

बुधवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘योद्धा कर्मयोगी’ पुस्तकाचे झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.
Shiv Sena Verdict : ठाकरे गटाच्या वकिलांची एक विनंती, सरन्यायाधीश चिडले, एक दिवस माझ्या जागी बसा, जीव मुठीत घेऊन पळाल
‘योद्धा कर्मयोगी हे पुस्तक माझा शेवट नाही. हा तर माझ्या आयुष्याचा केवळ ट्रेलर आहे. चित्रपट अजून बाकी आहे,’ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘शंभर टक्के निष्ठा आणि २०० टक्के विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच एकनाथ शिंदे तयार झाला आहे. प्रत्येक काम प्रामाणिकपणे केले, तसेच प्रत्येक गोष्ट समाजाचा विचार करून केली,’ असे ते म्हणाले.

‘शिंदे यांचे आयुष्य अमिताभप्रमाणे’

‘शिंदे यांचे आयुष्य अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे आहे. बच्चन यांचे ‘दिवार’ चित्रपटामध्ये वेगळे रूप दिसले, त्यानंतर ‘जंजीर’मधून त्यांनी वेगळे रूप दाखवले,’ असे राज्यपाल सी पी. राधाकृष्णन म्हणाले. ‘छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपली संस्कृती टिकून आहे. भारतीय लोकशाही सर्वांत शक्तिशाली आहे,’ असे मत व्यक्त करतानाच, ‘महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जपान आणि अन्य देशांपेक्षाही मोठी करू’ अशी ग्वाही राज्यपालांनी दिली.

प्रा. डॉ. प्रदीप ढवळ आणि डॉ.अरुंधती भालेराव, राजन बने व सान्वी ओक लिखित ‘योद्धा कर्मयोगी- एकनाथ संभाजी शिंदे’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी व्यासपीठावर पद्मश्री शंकरबाबा पापळकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, साहित्य संमेलनाध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्यासह मंत्री, आमदार आणि खासदार उपस्थित होते.

Source link

Eknath Shinde Biography LaunchEknath Shinde cryEknath Shinde MotherGangubai Shinde Videoअजित पवारएकनाथ शिंदेएकनाथ शिंदे पुस्तक प्रकाशन भाषणदेवेंद्र फडणवीसयोद्धा कर्मयोगी
Comments (0)
Add Comment