उमेदवारी कापली जाण्याची शक्यता
विधान परिषद निवडणुकीत ‘क्रॉस वोटिंग’ केल्याप्रकरणी काँग्रेसच्या आमदारांवर कारवाई करण्याचा निर्णय दिल्ली ‘हायकंमाड’ने घेतला आहे. क्रॉस वोटिंग करणाऱ्यांना विधानसभेला उमेदवारी देऊ नका, असे आदेश दिल्ली ‘हायकमांड’ने दिले आहेत. यामुळे आमदार खोसकर यांचीही उमेदवारी कापली जाण्याची शक्यता बळावली आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले यांची भेट घेण्यासाठी ते दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून होते . बुधवारी दिवसभर भेट होऊ शकली नसली तरी गुरुवारी दुपारी टिळक भवनात खोसकर आणि पटोले भेट झाली. सुरुवातीला शिष्टमंडळासमोर व नंतर बंद दाराआड चर्चा झाली. पटोले यांनी म्हणणे ऐकूण घेतले असले तरी उमेदवारीबाबत ठोस आश्वासन दिलेले नाही . त्यामुळे खोसकर यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले. प्रदेशाध्यक्षांसमवेत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा खोसकर यांनी केला आहे.
‘क्रॉस वोटिंग’ नसल्याचा दावा
खोसकर यांनी खुलासा करीत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला . ‘ क्रॉस वोटिंग’ केले नसल्याचा दावाही केला. पटोले यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असले तरी उमेदवारीबाबत ठोस शब्द दिला नसल्याचे समजते. उमेदवारी कापण्याबाबत अद्यप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगत पटोले यांनी खोसकरांना आश्वस्त केल्याचे समजते. अखिल भारतीय कॉंग्रस कमिटी खोसकरांच्या उमेदवारीबाबत निर्णय घेईल. त्यांना कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची परवानगी मिळण्याची शक्यता दुर्गम आहे, असे कॉंग्रेसचे सर्वोच्च नेते म्हणाले.