तेज पोलीस टाइम्स – परवेज शेख
न्यूज व जाहिरातीसाठी संपर्क-70306 46046
पुणे शहरामध्ये घरफोडी चोरी करणा-या अंतरराज्यीय टोळीस जेरबंद
Pune मार्केटयार्ड पोलीस ठाणे गुरनं १८७/२०२३ भा.द.वि. कलम ४५७,४५४,३८०,३४ मधील फिर्यादीचे संदेश सोसायटी, सरस्वती बंगला, भिमाले कार्यालया समोर, मार्केटयार्ड पुणे शहर येथे राहते घराचे कुलूप व कडी तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाट तोडून कपाटामधील सोन्याचे २९० ग्रॅम वजनाचे दागीने व चांदीचे दागीणे तसेच नगदी २५,००० रुपये असा एकूण १४,५८,१००/- रुपयाचा माल घरफोडी चोरी करुन घेवुन गेले बाबत गुन्हा दाखल आहे.
सदरचा गुन्हाचा तपास करीत असताना घटनास्थळावरुन स.पो.नि श्री. विनायक गायकवाड आयकार युनिट गुन्हे शाखा पुणे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली असता दोन ठसे विकसीत केले होते. सदर ठशाचे तपासणी केली असता त्यापैकी एक ठसा आरोपी नामे सिध्दु भय्यालाल रजपुत रा. शिंदे वस्ती शिवनगरी मागे, कोथरुड पुणे याच्याशी आयडेन्टीटी मिळालेली आहे. सदर आरोपीचा गुन्हयाचा पुर्व इतिहास पाहीला असता आरोपी विरुध्द महाराष्ट्रामध्ये मुंबई व पुणे शहरात एकुण ११ गुन्हे दाखल असल्याबाबत माहिती मिळाली त्यामध्ये आरोपी सिदु भहयालाल राजपुत याचा पत्ता गाव कानेमई अझुवा ता. सिराथु, जि. कौशाम्बी राज्य उत्तर प्रदेश असा पत्ता प्राप्त झाला असता मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे मार्केटयार्ड पोलीस ठाणे यांचे आदेशाने तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सुनिल भापकर, पोलिस स्टाफ यांनी आरोपीचे उत्तरप्रदेश येथील राहते घरी जावुन आरोपीचा शोध घेवुन आरोपी नामे छोटु ऊर्फ सिदु भहयालाल राजपुत वय ३० वर्षे, रा. गाव कानेमई अझुवा ता. सिराथु, जि. कौशाम्बी राज्य उत्तर प्रदेश यास ताब्यात घेवुन घरफोडी चोरी केलेल्या सोन्या व चांदीच्या दागिन्याबाबत आरोपीस विश्वासात घेवुन त्याचेकडे अधिक विचारपुस केली असता त्याने सदरची घरफोडी चोरी ही त्याचा साथीदार नामे अनिलकुमार रामसिंह बल्ली राजपुत, वय २७ वर्षे, रा. सध्या आण्णा ताथवडे यांचे बिल्डींग मध्ये मंडई, रामेश्वर चौक पुणे मुळ गाव बलपुर्वा, अझुवा, सैनी थाना, ता. सिराथु, जि. कौशाम्बी राज्य उत्तर प्रदेश याचेसह केली असल्याचे सांगुन १२,६६,७९४/-सोन्याची २४ तोळयाची लगड व १०,८९५/- रु.किं.चे चांदीचे दागिने व वस्तु एकुण १२,७७,६८९/- रुपयाचे माल हजर केल्याने ते जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपीतांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त, मनोज पाटील पुणे शहर यांचे सुचने नुसार मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५, पुणे शहर, श्री. आर. राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे शहर श्री. ध्यानकुमार गोडसे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पोलीस ठाणे पुणे शहर, श्रीमती माया देवरे, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन तपास पथकातील सहा पोलीस निरीक्षक मदन कांबळे, व पोउपनि सुनिल भापकर, पो. अमंलदार अमित जाधव, हिरवाळे, थोरात, कौस्तुभ जाधव, किरण जाधव, आशिष यादव यांच्या पथकाने केली आहे.