Nashik News: अपसंपदाप्रकरणी अनिल महाजनांवर गुन्हा; ACBची मोठी कारवाई, पत्नीही सहआरोपी, काय प्रकरण?

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेतील वादग्रस्त निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल चुडामण महाजन यांच्यासह त्यांच्या पत्नीवर बेकायदेशीररीत्या सव्वाकोटी रुपयांहून अधिक अपसंपदा जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नितीन नारायण पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल महाजनांसह पत्नी निशा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अनिल चुडामण महाजन हे अनेक वर्षे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून नाशिक महापालिकेत कार्यरत होते. दि. २२ ऑक्टोबर १९८६ ते ३१ मे २०१८ या कालावधीत त्यांनी कायदेशीर उत्पन्नापेक्षा १ कोटी ३१ लाख ४२ हजार ८६९ रुपये उत्पन्न अधिक मिळविल्याचे तक्रारीत म्हटले आहे . कायदेशीर उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न ४२ टक्क्यांनी अधिक असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले . अपसंपदा संपादित करण्याकरिता निशा अनिल महाजन यांनी प्रोत्साहन दिल्याने त्यांच्यावरही मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे सन २०१८ सुधारणा पूर्वीचे कलम १३(१) (इ) व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर तपास करीत आहेत .

अनिल देशमुखांविरोधात भाजपची होर्डिंगबाजी; ‘वसूली बुद्धी’ म्हणून हिणवलं, नागपुरात गुन्हा दाखल
महाजनांची कारकीर्द डागाळलेली …

महापालिकेच्या सेवेत अनेक वर्षे मुख्य अग्निशमन अधिकारीपदावर कार्यरत अनिल महाजन यांच्यावर २०२१ मध्ये नऊ प्रकारचे दोषारोप ठेवण्यात आले होते. त्यांची खातेनिहाय चौकशीदेखील करण्यात आली होती. अफरातफर करण्याबरोबरच महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका चौकशीत ठेवण्यात आला होता . अग्निरोधक साधनसामग्री खरेदी करताना लेखा विभागाला हिशेब सादर करण्यात आला नव्हता . शहरातील २३४ उंच इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यापूर्वी अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला देण्यासाठीदेखील अफरातफर केल्याचा महाजन यांच्यावर आरोप होता. त्यांचे निवृत्तिवेतनही बंद करण्यात आले होते . परदेश दौऱ्याच्या मंजुरीआधीच मुख्यालय सोडणे , वेळोवेळी विनापरवानगी गैरहजर राहिल्याप्रकरणी प्रशासनाने त्यांची विभागीय चौकशीदेखील लावली होती.

Source link

acbanil mahajanembezzlement case nashiknashik fire brigadenashik municipal corporationनाशिक बातम्यालाचलुचपत प्रतिबंधक विभाग
Comments (0)
Add Comment