अजितदादांच्या आमदाराला पाडणारच, ठाकरेंचा दावा, सर्वपक्षीय मधुर संबंध असलेला शिलेदार निवडला

प्रशांत श्रीमंदिलकर, खेड, पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुण्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दावा केला जात आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत होते. मात्र, आता ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांकडून दावेदारी सुरु झाल्यामुळे ही जागा पवार गट लढवणार की ठाकरे गट हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाचे अमोल पवार ही जागा लढवण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून अतुल देशमुख, सुधीर मुंगसे आणि रामदास ठाकूर हे इच्छुक आहेत तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, अमोल पवार, शिवाजी वर्पे, बाबाजी काळे, रामदास धनवटे, विजया शिंदे, संजूभाऊ घनवट असे इच्छुक आहेत.
Eknath Shinde Cries : एकटं समजू नकोस, तुझे अश्रू दिसतायत, मी इथेच आहे, मातोश्रींच्या शब्दांनी मुख्यमंत्री गहिवरले

खेड आळंदी विधानसभेचा काय आहे इतिहास?

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत स्व. सुरेश गोरे यांच्या रुपाने खेड तालुक्याला शिवसेनेचा पहिला आमदार मिळाला होता. गेल्या पाच विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहता, २०१४ चा अपवाद वगळता इथे शिवसेनेचा उमेदवार नेहमीच दोन नंबरला राहिला आहे. खेड आळंदी विधानसभेत शिवसेनेची ताकद मोठी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर विरोधक, मा. उपसभापती व खेड आळंदी विधानसभा निवडणूक समन्वयक अमोल पवार यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे.

अमोल पवार यांचे सर्वच पक्षातील खेड तालुक्यातील नेत्यांशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे सर्व विरोधक एकत्र येऊन विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांना चांगली टक्कर देऊ शकतात. गेल्या ४ निवडणुकांचा इतिहास पाहता, जर तिरंगी लढत झाली तर त्याचा फायदा हा नेहमीच दिलीप मोहिते यांना झाला आहे. परंतु २०१४ ला झालेल्या निवडणुकीत जरी भाजपकडून उमेदवार दिला गेला होता, तरी शिवसेनेच्या स्व. आमदार सुरेश गोरे यांनी विजय मिळवला होता.
Raosaheb Danve : राज्यसभा नको, विधानसभेलाही लढणार नाही; रावसाहेब दानवे म्हणतात, आदेश आला तर सरपंचही होईन
त्यावेळी तयार करण्यात आलेल्या परिवर्तन आघाडीमुळे हे शक्य झाले होते. २०१४ ला सर्व विरोधकांनी एकत्र येत परिवर्तन आघाडी उभी केली व त्यातूनच दिलीप मोहिते यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा ही परिवर्तन आघाडी उभी करण्यात अमोल पवार यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. आताच्या निवडणुकीत सु्द्धा दिलीप मोहिते यांना पराभूत करायचे असल्यास एकास एक उमेदवार दिला पाहिजे अशी तालुक्यात चर्चा आहे.

सर्व विरोधकांना एकाच व्यासपीठावर आणण्याची क्षमता सध्या फक्त अमोल पवार यांच्या मध्येच आहे. अमोल पवार यांना उमेदवारी दिल्यास आपण त्यांचे प्रचारप्रमुख म्हणून काम करु असे खेड तालुका शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे तालुका अध्यक्ष व माजी उपसभापती राजुशेठ जवळेकर यांनी सांगितले होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात इतरही इच्छुक असल्यामुळे पक्ष उमेदवारी कोणाला देतो, कोण बंडखोरीचा झेंडा हातात घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. प्रत्येक जण आपापल्या परीने उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा राक्षे हे देखील इच्छुक आहेत, त्यांना उमेदवारी मिळावी, ही इच्छा त्यांनी वारंवार बोलून दाखवली आहे. परंतु नेहमीच त्यांना डावललं गेलं.

गेल्या निवडणुकीला ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे आवाहन करणारे दिलीप मोहितेच राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. तरी मागच्या वेळी शेवटची निवडणूक म्हणणाऱ्या दिलीप मोहितेंना मतदार यावेळी कितपत स्वीकारतात, भाजपा, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस काय भूमिका घेतात हे देखील महत्त्वाचे आहे.

Source link

ajit pawarMaharashtra politicsUddhav ThackerayVidhan Sabha Election 2024अमोल पवारखेड आळंदी विधानसभादिलीप मोहिते पाटीलमहाविकास आघाडी
Comments (0)
Add Comment