संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग, संभाजीराजेंसमोर चित्रपट महामंडळ उपाध्यक्ष ढसाढसा रडले

कोल्हापूर : कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाचा जिवंत साक्षीदार असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री भीषण आग लागली होती. या आगीत नाट्यगृह जळून भस्मसात झाले असून, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज सकाळी संभाजीराजे छत्रपती यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांना संभाजीराजेंसमोर अश्रू अनावर झाले.

नाट्यगृहाला लागूनच शाहू खासबाग मैदान आहे. या ठिकाणी लाकडी साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. शेजारी असलेल्या विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट झाल्याने बाहेर ठेवलेल्या लाकडी साहित्याने पेट घेतला. त्यानंतर शेजारीच असलेल्या नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणेचा स्फोट झाला आणि संपूर्ण नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले.

खुर्च्या आणि लाकडी साहित्य असल्यामुळे काही क्षणातच आगीने रौद्र रुप धारण केले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या; परंतु आग आटोक्यात आणणे कठीण झाल्याने या नाट्यगृहाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.
आमचं घर ,वैभव गेलं…केशवराव भोसले नाट्यगृहाची अवस्था पाहून ओक्साबोक्शी रडली मराठी अभिनेत्री
संपूर्ण नाट्यगृह आगीत जळून खाक झाले असल्यामुळे कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी १९१२ मध्ये पॅलेस थिएटर नावाने हे नाट्यगृह बांधले होते. त्यानंतर यास संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे नाव बहाल करण्यात आले.

संभाजीराजे हळहळले

अतिशय दुखःद घटना! कोल्हापूर कलाक्षेत्रातला काळा दिवस!! कोल्हापूरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि कुस्तीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खासबाग मैदानाला भीषण आग लागली आहे. महाराजांनी रोमच्या थिएटरच्या धर्तीवर उभारलेले हे अत्यंत देखणे नाट्यगृह आणि मैदान हे आमच्या सांस्कृतिक ठेव्याचे एक महत्त्वाचे भाग आहेत. यांचे जळणे पाहून मनाला तीव्र दुःख होत आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाने लोकांना भरपूर दिले; त्यांचा अभाव अधिकच तीव्र आभास देतो. हे पाहणे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, रंगकर्मींचं हक्काचा व्यासपीठ असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सकाळी पाहणी केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मदत मिळवण्याची आणि हे नाट्यगृह पुन्हा उभी करण्याची मागणी करणार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

Source link

Keshavrao Bhosale Theater FireKolhapur Drama Theater FireKolhapur newsकोल्हापूर आगकोल्हापूर नाट्यगृह आगमिलिंद अष्टेकरसंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगसंभाजीराजे छत्रपती
Comments (0)
Add Comment