Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार श्रावणात हे उपाय करुन पाहा, सुख-समृद्धीत वाढ, पैशांची कमतरता होईल दूर

Shravan vastu upay : श्रावण महिना सुरु झाला असून अनेक सणांची रेलचेलही सुरु झाली आहे. हा महिना पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित करण्यात आला आहे. भगवान शिवसह देवी पार्वतीची पूजा केली जाते. या वेळी सर्वत्र सकारात्मक वातावरण असते.
वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिना पवित्र मानण्यात आला आहे. या महिन्यात काही खास उपाय केल्याने शिवभक्तीचे फळ दुप्पट मिळते आणि सौभाग्यात वाढ होते. याशिवाय भगवान शिवाच्या पूजेसाठी काही विशेष काळजी घेण्याचेही वास्तूमध्ये सांगितले आहे. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार श्रावणात हे उपाय करुन पाहा, सुख-समृद्धीत वाढ, पैशांची कमतरता होईल दूर
Shravan Vastu Tips 2024 :
श्रावण महिना सुरु झाला असून अनेक सणांची रेलचेलही सुरु झाली आहे. हा महिना पूर्णपणे भगवान शिवाला समर्पित करण्यात आला आहे. भगवान शिवसह देवी पार्वतीची पूजा केली जाते. या वेळी सर्वत्र सकारात्मक वातावरण असते.
वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिना पवित्र मानण्यात आला आहे. या महिन्यात काही खास उपाय केल्याने शिवभक्तीचे फळ दुप्पट मिळते आणि सौभाग्यात वाढ होते. याशिवाय भगवान शिवाच्या पूजेसाठी काही विशेष काळजी घेण्याचेही वास्तूमध्ये सांगितले आहे. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

या दिशेला ठेवा शिवलिंग

श्रावण महिन्यात घरात शिवलिंग ठेवत असाल तर ईशान्य कोपऱ्यात ठेवा. ही दिशा देवी- देवतांची असल्याने शुभ मानली जाते. या दिशेला भगवान शंकराची पूजा केल्याने घरात सुख- समृद्धी येते. तसेच सकारात्मक ऊर्जा देखील प्राप्त होते.

शुभ चिन्ह

श्रावण महिन्यात दररोज मुख्य दरवाजावर गंगाजल शिंपडावे. तसेच दरवाजाच्या चौकटीवर स्वस्तिकचे शुभ चिन्ह काढावे. घराच्या दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावा. शिवलिंगाची पूजा करावी. यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहाते.

पैशांची चणचण कमी ​

वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगाची पूजा करण्यापूर्वी रुद्राक्ष शिवलिंगाजवळ ठेवा नंतर अभिषेक करुन पूजा अभिषेक करावा. रुद्राक्ष लाल कपड्यात बांधून तिजोरी किंवा कपाटात ठेवा किंवा घराच्या मुख्य दाराशी बांधा. असे केल्याने घरात भरभराटीला सुरुवात होते.

तुळशीचे रोप

घरात तुळशीचे रोप लावल्याने सुख, शांतीसह सकारात्मक ऊर्जा वाढते. श्रावण महिन्यात घरात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते. घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावून पूजा केल्याने सौभाग्य वाढते. शिवपूजेत तुळशीचा वापर करणे टाळा.

बेलपत्र

तुळशीशिवाय घरातच्या अंगणात ईशान्य दिशेला बेलपत्राचे रोप लावणे शुभ मानले जाते. शिवपुराणात असे म्हटले आहे की बेलपत्राचे झाड लावल्याने ते स्थान काशीसारखे पवित्र होते. तसेच घरातील दारिद्रय दूर होते.

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

पैशांची चणचण कशी कमी कराल?भगवान शिवाचा आशीर्वादवास्तु उपायवास्तुशास्त्र काय सांगते?सुख-समृद्धीत वाढ कशी कराल?
Comments (0)
Add Comment