दारु प्यायला पैसे देण्यास नकार, संतापात लाथा बुक्क्यांनी मारहाण; डोक्यात दगड घालून संपवलं

पुणे : पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी डोकं वर काढताना पाहायला मिळत आहे. त्यातच हडपसर परिसरांमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून दोन अनोळखी व्यक्तींनी एका तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. हडपसर परिसरातील रामटेकडी भागामध्ये हा प्रकार घडला आहे.राजू शिवशरण असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून त्याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात महेश शिंदे, नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बावरी, दुर्गेश बल्ल्या गायकवाड (रा. सर्व रामटेकडी, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Gujarat News: वर्षातून एकदा अमेरिकेतून येते शिक्षिका; दर महिन्याला घेते पगार; चक्रावून टाकणारं गुजरात मॉडेल

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास रामटेकडी परिसरातील वंदे मातरम चौक येथे महेश शिंदे, नितीन पाटोळे, अरविंद माने, चेतन बावरी, दुर्गेश बल्ल्या गायकवाड आणि इतर दोन अनोळखी इसम यांनी दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून राजू शिवशरण याला लाथा बुक्क्याने मारून गंभीर जखमी केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर फिर्यादी असलेल्या मुलाला देखील या आरोपींनी मारहाण करून जखमी केले आहे. जखमेवर उपचार करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.

Source link

hadapsar one murderPune crime newspune hadapsar one murderPune Policeपुणे क्राइम बातम्यापुणे पोलीसपुणे हडपसर एकाची हत्याहडपसर एकाची हत्या
Comments (0)
Add Comment