लोकसभेला निर्भेळ यश, विधानसभेलाही एकजुटीने सामोरे जाणार, मविआचा १६ तारखेला शंखनाद

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून त्यासाठी या दोघांनीही दंड थोपटलेले पाहायला मिळत आहे. महायुतीच्या पाठोपाठ महाविकास आघाडीही आता राज्यभर सभा बैठका संवाद यात्रा सुरू करणार आहे. महाविकास आघाडी १६ ऑगस्टला आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडणार आहे तर महायुती २० ऑगस्टपासून राज्यभरात संवाद यात्रेला प्रारंभ करणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने महाविकास आघाडीची पहिली सभा मुंबईमध्ये १६ ऑगस्टला षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग याच सभेतून महाविकास आघाडी फुकंणार असल्याचे समजते.
विधानसभेसाठी उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, ‘या’ दिवशी दिल्ली दौरा करणार, बड्या नेत्यांची घेणार भेट

त्यानंतर २० ऑगस्टला काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वांद्र्यातील बीकेसी येथे एक सभा पार पडणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची शिवनेरीवरून शुक्रवारपासून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झाली आहे. तर शनिवारपासून काँग्रेस पक्षाचे नेते मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून प्रभारी रमेश चन्नीथला हेही यावेळी उपस्थित असणार आहेत. मराठवाड्यातील जागा वाटपांच्या चर्चेसह प्रचारांच्या छोट्या-मोठ्या सभा पार पडणार आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील बालेकिल्लामध्ये मेळावा घेणार आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, विधानसभेचा शंखनाद होणार

महाविकास आघाडीच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी महायुतीनेही कंबर कसली असून २० ऑगस्टला कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचे दर्शन घेऊन महायुतीच्या संवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत संवाद यात्रेबाबतची रणनिती ठरल्याचे समजते. त्यानुसार २८८ मतदार संघामध्ये महायुतीची ही संवाद यात्रा होणार आहे. कोल्हापूरमध्ये सुरुवात केलेल्या संवाद यात्रेची सांगता मुंबईमध्ये होणार आहे. एका दिवसाला दोन किंवा तीन मतदारसंघांमध्ये ही संवाद यात्रा होईल. राज्याच्या सातही विभागामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या संयुक्त जाहीर सभा होणार आहेत.

दरम्यान, महायुतीच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टला बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला जाणार असून त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थीतीत देखील कार्यक्रम घेणार आहे.

Source link

Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha ELection 2024mahavikas aghadiVidhan Sabha Election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूकमहाविकास आघाडी विधानसभा प्रचारविधानसभा निवडणूक प्रचार
Comments (0)
Add Comment