विधानसभेला महायुती साताऱ्यातील सर्व जागा जिंकून विक्रम करणार, फडणवीसांना विश्वास

संतोष शिराळे, सातारा : जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर आहे. सातारा लोकसभेला जसा विजय मिळाला, त्याचप्रमाणे येत्या विधानसभेलाही महायुती जिल्ह्यातील सर्व जागा जिंकून विक्रम करेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सातारा येथे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. लोकसभेतील विजयासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान केल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. उदयनराजे भोसले यांना निवडून दिल्याबद्दल त्यांनी जनतेचेही आभार मानले.
BJP Meeting : भाजप प्रायव्हेट लिमिटेड पक्ष करायचा का? लोणीकर आणि दानवे वाद पुन्हा चव्हाट्यावर

विधानसभेला महायुती साताऱ्यातील सर्व जागा जिंकून विक्रम करणार

गेल्या अनेक वर्षांमध्ये भाजपाचे काम सातारा जिल्ह्यामध्ये वाढले आहे. आज भाजपा हा सातारा जिल्ह्यातील प्रमुख पक्ष आहे. ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीला यश मिळाले तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत देखील या जिल्ह्यात महायुतीच्या सर्व जागा निवडून येतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त आहे.
पावसात भिजले तरी आता मतं देणार नाही, पवारांना टोला, चंद्रकांतदादा म्हणजे आदिमानव, जरांगेंचा हल्ला

पक्ष कार्यालयाचे मोठेपण त्याच्या भव्यतेत नाही, लोकाभिमुखतेत आहे!

स्वराज्याच्या राजधानीत साताऱ्यामध्ये भाजपला स्वत:च जिल्हा कार्यालय होत आहे. याचा आनंद आहे. तथापि, हे कार्यालय किती प्रशस्त आहे, यापेक्षा ते लोकाभिमुख जनतेला किती न्याय देते हे महत्त्वाचे आहे. भाजपचे जिल्हा कार्यालय जनतेसाठी हक्क्काचे ठिकाण म्हणून स्थापित व्हावे, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.
परमबीर सिंग अन् देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘डील’ झाली होती; अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा

फडणवीस यांच्या हस्ते भाजप जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन

सातारा येथे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते.

‘लाडक्या बहिणीं’सोबत रक्षाबंधन!

भाजपा सातारा जिल्हा कार्यालय भूमिपूजन सोहळ्यापूर्वी पक्षासाठी सदैव झटणाऱ्या कार्यकर्त्या भगिनींसोबत देवेंद्र फडणवीस यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. भगिनींच्या प्रेम आणि आपुलकीसाठी ऋणी असल्याचे फडणवीस म्हणाले.

Source link

devendra fadanvisDevendra fadanvis bhumipoojan BJP Satara officeDevendra fadanvis Satara DauraDevendra fadanvis Satara Speechदेवेंद्र फडणवीसदेवेंद्र फडणवीस सातारा दौरादेवेंद्र फडणवीस सातारा भाजप कार्यालय भूमिपूजन
Comments (0)
Add Comment