एकाच समाजाला तीन-तीन आरक्षण मागितले जात आहेत हे संविधानाला धरून नाही असे सांगून प्रकाश शेंडगे पुढे म्हणाले, जरांगे पाटील यांचं आरक्षणाविषयीच आंदोलन राहिलं नसून त्यांचे आंदोलन राजकीय स्वरूपाचे बनले आहे. म्हणूनच त्यांच्या सांगलीतील मोर्चाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता असा आरोप शेडगेंनी लावला.
मनोज जरांगे काय म्हणाले?
सरकार आरक्षण द्यायला तयार नाही. मराठ्यांनी रग आणि धग दाखवायची वेळ आली आहे. आतापर्यंत आपण पक्ष आणि नेत्याला मोठे केले. तुमची लढाई तुम्हाला अंगावर घ्यावी लागेल. आरक्षण न दिल्यास २८८ आमदार तुमचे नाहीत. ते पाडायचे आहेत. समाजाचे एकास-एक उमेदवार देऊन २८८ आमदार पाडू. त्यासाठी पक्ष आणि नेत्याला बाजूला ठेवून जातीसाठी एकजूट दाखवा. तत्पूर्वी आरक्षण द्या; अन्यथा सत्तेत घुसून घेऊ,’ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी गुरुवारी सांगलीत दिला. तत्पूर्वी, २९ ऑगस्टला अंतरवाली सराटीला देशातील सर्वांत मोठी बैठक होईल, असे सांगून त्याला उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सांगलीतील राम मंदिर चौकात मराठा आरक्षण जागृतीसाठी आणि शांतता यात्रेच्या निमित्ताने जरांगे यांची जाहीर सभा झाली. विश्रामबाग ते राम मंदिर चौक अशी शांतता रॅली जरांगेंच्या नेतृत्वात काढण्यात आली होती.