Thane : बारवी धरण ओव्हरफ्लो; मुंबईनजीकच्या ‘या’ ६ महानगरपालिका आणि २ नगरपालिकांचे टेन्शन मिटले

बदलापूर, प्रदिप भणगे : ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे एमआयडीसीचे बारवी धरण शुक्रवारी पहाटे पाच वाजता पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे. बारवी धरणात सध्या ३३९.५६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. बारावी धरणाची उंची ७२.६० मीटर इतकी असून मागील काही दिवसांच्या पावसानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर ते ओसंडून वाहू लागले आहे.

अकरा स्वयंचलित दरवाजांच्या वाटे १४० क्यूसेक पाणी ओसंडून वाहत आहे…

बारवी धरणावरील अकरा स्वयंचलित दरवाजांच्या वाटे १४० क्यूसेक पाणी ओसंडून वाहत असल्याने ठाणे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.‌ ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका, दोन नगरपालिका आणि औद्योगिक क्षेत्राला बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने ऑगस्टच्या सुरुवातीलाच भरल्यामुळे पुढील वर्षभर ठाणे जिल्ह्यावरील पाणी कपातीचे संकट टाळणार आहे. कारण यंदा जून अखेरपर्यंत पाऊस न पडल्यामुळे ही याच धरणात २९% इतका पाणीसाठा शिल्लक राहिला होता. मात्र तरीही पाटबंधारे विभागाने ठाणे जिल्ह्यात पाणी कपात लागू केली नव्हती. त्यामुळे पावसाला अजून दोन महिने शिल्लक असतानाच हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे पुढील वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा सध्या बारवी धरणात उपलब्ध झाला आहे.
नाशिककरांसाठी Good News! धरणे भरली, चिंता सरली; जिल्ह्यातील अर्धे प्रकल्प फुल्ल, कोणत्या धरणात किती पाणी?

जिल्ह्यातील ‘या’ शहारांना दिलासा….

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी – निजामपूर या महानगरपालिका तसेच अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका तसेच ठाणे जिल्ह्यातील एमआयडीसीला बारवी धरण भरल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

नदी काठच्या गावांना एमआयडीसी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा..

बारवी धरणाच्या उलथ्या पासून तयार होत असलेल्या बारवी नदीकाठी असलेल्या गावांना बारवी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातून पाणी ओसंडून वाहत असल्याने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी पाण्यात जाऊ नये तसेच याच ठिकाणी पर्यटकांना देखील पाण्यात जाण्यास मज्जाव करावा अश्या सूचना एमआयडीसी प्रशासनाने स्थानिक पोलीस आणि महसूल विभागाला दिल्या आहेत.

Source link

barvi dam newsbarvi dam water levelbarvi water damthane water damठाणेठाणे महानगरपालिकाधरण पाणीसाठाबारावी धरण
Comments (0)
Add Comment