शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला ग्रामपंचायतीची नोटीस, राज्यात चर्चेचा विषय

मोबीन खान, शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळाकडे काकडी ग्रामपंचायतीची कराची रक्कम सातत्याने पाठपुरावा करुनही मिळत नसल्याने महाराष्ट्र ग्रा.पं. अधिनियम १९५८ कलम १२९ अन्वये शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे असलेली थकीत कराची बाकी न भरल्याने जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट विमानतळ प्रशासनास मंगळवारी ग्रामंचायतीने दिले आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाला जप्तीची नोटीस देण्यात आल्याने हा चर्चेचा विषय बनलाय.

ग्रामपंचायतीने महाराष्ट्र विमान विकास प्राधिकरण कंपनी, मुंबई यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, कर बाकी भरणेबाबत सातत्याने दिलेले पत्रे, फेब्रुवारी २३ मध्ये दिलेले अंतिम स्मरणपत्र, २४ मार्च २४ रोजी हुकुम नोटीस, १२९ प्रमाणे दिलेली करवसुली नोटीस,राष्ट्रीय लोक अदालत नोटीस, ग्रामपंचायीचा मासिक सभा ठराव देऊनही कर भरणा केलेला नाही सन २०१६-१७ पासून कर आकारणी केलेली आहे. कराची रक्कम ८ कोटी ३० लाख रुपये प्राप्त होत नसल्याकारणाने गावाच्या सर्वांगीण विकासावर व दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे सदर थकबाकी वसूली करिता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १२९ अन्वये नुसार जंगम मालमत्ता जप्ती वॉरंट बजाविण्यात येत आहे असल्याचे पत्रात म्हटले आहे.

असे आहे मालमत्तेचे स्वरूप

कराची थकबाकी न भरल्यामुळे मालमत्तांची करपात्र जंगम मालमत्ता पुढीलप्रमाणे-

आर सी सी पद्धतीचे घर टर्मिनल बिल्डिंग पहिला मजला
आर सी सी पद्धतीचे घर टर्मिनल बिल्डिंग (पोर्च)
आर सी सी पद्धतीचे घर पेव्हर ब्लॉक एरिया पहिला मजला
आर सी सी पद्धतीचे घर इंडियन आईल पंप पहिला मजला
आर सी सी पद्धतीचे घर सबस्टेशन बिल्डिंग पहिला मजला
आर सी सी पद्धतीचे घर पॅावर (जेनरेटर बिल्डिंग) पहिला मजला
मनोरा तळ घर ए टी सी टावर पहिला मजला
आर सी सी पद्धतीचे घर रणवे पहिला मजला
आर सी सी पद्धतीचे घर जी एस आर वॉटर टैंक पहिला मजला
आर सी सी पद्धतीचे घर वॉल कंपोंड पहिला मजला
आर सी सी पद्धतीचे घर पार्किंग रस्ता नं. १ पहिला मजला
आर सी सी पद्धतीचे घर पार्किंग रस्ता नं. २ पहिला मजला
पडसर खुली जागा ८२३.५० एकर

Source link

kakadi gram panchayatshirdi airportShirdi International AirportShirdi International Airport informationshirdi saibabaकाकडी ग्रामपंचायत नोटीस शिर्डी विमानतळशिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळशिर्डी साईबाबा
Comments (0)
Add Comment