महेश पाटील, नंदुरबार : नवापूर तालुक्यातील ढोरपाडा येथील पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून वाद असल्याने दोन महिन्यांपूर्वी पत्नी माहेरी राहायला गेली. गुरुवार रोजी विसरवाडी येथे आठवडे बाजारात ही महिला बाजार करायला गेली असता तिच्या पतीला ती दिसली. भरदुपारी त्याने त्याच्या हातातील तीक्ष्ण हत्याऱ्याने हल्ला चढवत छातीवर आणि पोटावर सपासप वार केल्याची घटना काल दुपारी १२.३० वाजेदरम्यान घडली. महिलेवर हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी युवक धाऊन आल्याने हल्लेखोराला पकडून ठेवत महिलेला उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिच्या मृत्यू झाला. रुग्णालयात महिलेच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला नातेवाईकांनी रुग्णालयात आणि पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली.अशोक ताऱ्या गावित (रा. ढोरपाडा ता. नवापूर) असं हल्ला करणाऱ्या पतीचे नाव आहे. हल्ल्यात मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव बबीता अशोक गावित (वय २५ ) असं आहे. विसरवाडीत काल आठवडे बाजार असल्याने दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास विसरवाडी येथे पत्नी बाजारासाठी आली असता भरदिवसा महिलेवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला आहे. पतीने धारदार शस्त्राने वार करत महिलेच्या छातीवर आणि पोटावर सपासप वार केला. पत्नीने रक्तभंबाळ अवस्थेत शस्त्राचा वार बचावण्यासाठी हात आडवा करण्याचा प्रयत्न केला, या प्रयत्नात हात देखील कापला गेला. यावेळी महिलेला वाचवण्यासाठी आजूबाजूच्या तरुणांनी हल्ला करणाऱ्याला पतीला पकडून ठेवल्याने जखमी महिलेला उपचारासाठी विसरवाडी रुग्णालयात दाखल केले.
महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यावेळी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे खासगी वाहनाने नातेवाईकांनी सदर जखमी महिलेस नंदुरबार जिल्हा रुग्णालय गाठले. याबाबत मयत महिलेच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली. तर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार करत असताना पत्नीची प्राणज्योत मालवली.नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश
महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यावेळी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे खासगी वाहनाने नातेवाईकांनी सदर जखमी महिलेस नंदुरबार जिल्हा रुग्णालय गाठले. याबाबत मयत महिलेच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली. तर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार करत असताना पत्नीची प्राणज्योत मालवली.
नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश
पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असल्याने पिडीत महिला बबीता गावित दोन महिन्यापासून दापूर येथे आई-वडिलांकडे राहायला गेली होती. अशी माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर काही कामानिमित्त बाजारात गेली असता तिच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने रुग्णालयात महिलेच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. नातेवाईकांनी रुग्णालयात आणि पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली.
पोलिसांनी आरोपी पतीला अटक
या घटनेची माहिती तात्काळ विसरवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मयत महिलेचा पती अशोक गावित यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आसा आहे. पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहेत.