कोल्हापूरच्या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी १० कोटी, CM एकनाथ शिंदेंची घोषणा

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूरच्या सांस्कृतिक इतिहासाचा आत्मा असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सात दिवसांत सादर करा’, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधीही जाहीर केला.

कोल्हापुरातील हे नाट्यगृह गुरुवारी रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामुळे त्याची तातडीने पुनर्बांधणी करण्याची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत. दरम्यान, जळालेल्या नाट्यगृहाला भेट देण्यासाठी लोकप्रतिनिधींची शुक्रवारी रांगच लागली. येत्या वर्षभरात येथे नवीन नाट्यगृह बांधण्याचा निर्धार अनेकांनी केला. पहिले पाऊल म्हणून शाहू ग्रुपच्या वतीने दहा लाखांचा निधी जाहीर करण्यात आला. राजर्षी शाहू महाराजांनी १९१५मध्ये हे नाट्यगृह बांधले आहे. या नाट्यगृहाला लागलेली आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज होता; पण ‘महावितरण’ने याबाबत खुलासा करताना त्याचा इन्कार केला आहे.
Keshavrao Bhosale Theatre: कोल्हापूरकरांच्या डोळ्यातून अश्रू अनावर; असा आहे शाहू महाराजांची आठवण असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचा इतिहास
शुक्रवारी सकाळी नाट्यगृहाच्या परिसराची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती दिली. नुकसानीची माहिती घेऊन क्षीरसागर यांनी पुनर्बांधणीसाठी आवश्यक आराखडा तत्काळ तयार करावा. यामध्ये कलाकारांना व या क्षेत्राशी संबंधित अनुभवी व्यक्तींची मते विचारात घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले. नाट्यगृहात नाटकाच्या पुढील प्रयोगासाठी ठेवलेले लाखो रुपयांचे साहित्य मातीमोल झाल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याची माहिती उपस्थित कलाकारांनी क्षीरसागर यांना दिली. यावर क्षीरसागर यांनी पाच लाख रुपयांची वैयक्तिक मदत जाहीर केली.
Keshavrao Bhosale Theater Fire : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भस्मसात, संभाजीराजेंसमोर चित्रपट महामंडळ उपाध्यक्ष ढसाढसा रडले

काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींकडून पाच कोटींचा निधी

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या पुनर्बांधणीसाठी कोल्हापुरातील काँग्रेसच्या खासदार, आमदार यांच्याकडून पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पुनर्बांधणीसाठी काँग्रेसच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य व प्रयत्न केले जातील अशी ग्वाही काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आपल्या आमदार निधीतून दीड कोटी, खासदार शाहू महाराज आणि आमदार जयंत आसगावकर यांनी प्रत्येकी एक कोटी, आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव यांनी प्रत्येकी ७५ लाख रुपये असा एकूण पाच कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे जिल्हा नियोजन समितीला पत्र दिले आहे.’ केंद्रीय सांस्कृतिकमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन खासदार महाडिक यांनी नाट्यगृह उभारणीसाठी आर्थिक निधीची मागणी केली.

Source link

10 crore for kolhapur Theatrecm shindeKeshavrao Bhosle TheatreKolhapurnews for artistकलाकरांसाठी दुखद बातमीकोल्हापूरचा सांस्कृतिक इतिहासकोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहमुख्यमंत्री एकनाथ शिंदे१० कोटींचा निधी
Comments (0)
Add Comment