आधी ‘राज’की बात, मग उद्धवना हात, आता सोडणार शिंदेंचीही साथ? जयंत पाटलांना मोहरा गवसणार?

प्रशांत श्रीमंदिलकर, जुन्नर, पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाकडून स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कालच यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी भेट घेतली. जयंत पाटील आणि शरद सोनवणे यांनी एकत्र जेवण केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.

शिवस्वराज्य यात्रेदरम्यान जुन्नरमधील जय हिंद महाविद्यालय येथे जेवणासाठी जयंत पाटील थांबले होते. त्यावेळी अचानक या ठिकाणी शरद सोनवणे यांनी उपस्थिती लावली. यामुळे तालुक्यात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. मात्र याबाबत स्पष्टीकरण देताना शरद सोनवणे यांनी सांगितले की, जयंत पाटील आणि माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मागच्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये आम्ही एकत्र काम केले आहे. जागतिक आदिवासी दिन असल्याने या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त आम्ही एकत्र आलो होतो. त्यांनी मला बोलावले म्हणून मी जेवायला आलो होतो. असं म्हणत त्यांनी या भेटीमागे कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्ट केले आहे.
Ajit Pawar : शरद पवारांवर टीका करु नका, असं मोदींना कधीच सांगितलं नाही, चुकीच्या चर्चांवर अजितदादा चिडले

कोण आहेत शरद सोनवणे?

शरद सोनवणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले ते मनसेचे एकमेव आमदार होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्ष बदलून शिवसेनेत प्रवेश केला होता, मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदेंची साथ दिली.
Uddhav Thackeray : अजितदादांच्या आमदाराला पाडणारच, ठाकरेंचा दावा, सर्वपक्षीय मधुर संबंध असलेला शिलेदार निवडला
मागच्या महिन्यामध्ये अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक जण येण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत गेलेले परभणीतील बडे नेते आणि माजी विधान परिषद आमदार बाबाजानी दुर्रानी यांची भेटही जयंतरावांनी घेतली होती.

जयंत पाटील सध्या पक्षात घरवापसी करणाऱ्यांसाठी दुवा ठरत असल्याने इथेही जयंत पाटील आणि शरद सोनवणे यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये शरद सोनवणे हे शरद पवार गटात प्रवेश करतात का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Source link

Eknath Shinde Shiv SenaMaharashtra politicsmaharashtra vidhansabha nivadnukSharad PawarSharad Sonawane meets Jayant Patilजुन्नर विधानसभा मतदारसंघराजकीय बातम्याविधानसभा निवडणूक २०२४शरद सोनवणे
Comments (0)
Add Comment