पुन्हा हिट अँड रन; रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या दिव्यांगाला कारने उडवलं, निष्पापाचा बळी

महेश पाटील, नंदुरबार : राज्यात हिट अँड रनच्या अनेक घटना घडत असताना नंदुरबार येथेही अशीच घडना समोर आली आहे. रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या एका दिव्यांगाला अज्ञात चारचाकी वाहनाने जोरात धडक देऊन पसार झाल्याची घटना गुरुवारी रोजी रात्री साडेबारा वाजेदरम्यान घडली. या अपघातात दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर ८ ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास एका अनोळखी दिव्यांग व्यक्तीला एका ग्रे रंगाच्या चारचाकी वाहनावरील चालकाने उडवलं. त्याच्या ताब्यातील वाहन हे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून अपंग व्यक्तीला जोराची धडक दिली. यात तो गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी विशाल
कोमलसिंग राजपूत (रा.मोठा मारूतीमागे कुंभारवाडा, नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अपघातानंतर दिव्यांग व्यक्तीकडे कुठलेही ओळपत्र नसल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विकास गुंजाळ करत आहेत.
Sharad Sonawane : आधी ‘राज’की बात, मग उद्धवना हात, आता सोडणार शिंदेंचीही साथ? जयंत पाटलांना मोहरा गवसणार?

दिवसाढवळ्या पत्नीची हत्या

दरम्यान, नवापूर तालुक्यातील ढोरपाडा येथील पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून वाद असल्याने दोन महिन्यांपूर्वी पत्नी माहेरी राहायला गेली. गुरुवार रोजी विसरवाडी येथे आठवडे बाजारात ही महिला बाजार करायला गेली असता तिच्या पतीला ती दिसली. भरदुपारी त्याने त्याच्या हातातील तीक्ष्ण हत्याऱ्याने हल्ला चढवत छातीवर आणि पोटावर सपासप वार केल्याची घटना काल दुपारी १२.३० वाजेदरम्यान घडली. महिलेवर हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी युवक धाऊन आल्याने हल्लेखोराला पकडून ठेवत महिलेला उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिच्या मृत्यू झाला. रुग्णालयात महिलेच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला नातेवाईकांनी रुग्णालयात आणि पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली.

Source link

crime newshit and run casenandurbar accident newsnandurbar hit and run caseक्राइम बातम्यानंदुरबार अपघात बातम्यानंदुरबार हिट अँड रन केसहिट अँड रन केस
Comments (0)
Add Comment