विधानसभेच्या तोंडावर आरक्षणासाठी सरकारकडून हालचाली, अजित पवारांनीच केले स्पष्ट; म्हणाले मुख्यमंत्री लवकरच…

मुंबई : मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तप्त होत आहे. मनोज जरांगे पाटील हे शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन लोकांमध्ये गेले आहेत. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीवर जरांगे ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला, त्यामुळे मराठा समाज पुन्हा संतप्त झाला आहे आणि सर्वपक्षीयांकडून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करत आहेत. यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलावणार असल्याची माहिती दिली. मराठा समाजाकडून अजित पवार यांनी देखील आरक्षणप्रश्नी भूमिका स्पष्ट करत नसल्याची तक्रार वारंवार केली जात होती. पण अजित पवारांनीही आता यात सक्रिय सहभाग घेतला असल्याचे दिसत आहे.

एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार म्हणाले की, ‘आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी याआधी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. आता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच बैठक बोलावली जाणार आहे.’ यासोबतच अजित पवारांनी राज्यसभा निवडणुकीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत देखील भाष्य केले आहे. राज्यसभेची रिक्त जागा राष्ट्रवादीच लढणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे.
Ajit Pawar : शरद पवारांवर टीका करु नका, असं मोदींना कधीच सांगितलं नाही, चुकीच्या चर्चांवर अजितदादा चिडले
अजित पवार पुढे म्हणाले, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्ह्यात आपला खासदार आहे, भाजपसाठी आपण जागा सोडली आहे तर आता राज्यसभेची जागा राष्ट्रवादीच लढणार आहे. यामुळे आता राज्यसभेच्या रिक्त जागेवरुन महायुतीत नवीन कोणत्या राजकीय घडामोडी घडतात हे पाहावं लागणार आहे.

मनोज जरांगेंनी शांतता रॅली दरम्यान छगन भुजबळांना लक्ष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, भुजबळांना जो नेता प्रचाराला घेऊन जाईल, त्याचा उमेदवार पाडायचा. याबद्दल अजित पवारांना विचारलं असता त्यांनी यावर उत्तर देणे टाळले आहे. नो कमेंट्स म्हणत अजित पवारांनी टाळले.
मराठा आरक्षणाची मागणी दंडूकशाही, हुकुमशाही आणि दडपशाहीने सुरू; प्रकाश शेडगेंचा हल्लाबोल
अजित पवारांनी बंड केल्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत. ज्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. याबद्दल बोलताना अजित पवारांनी आम्ही महायुती म्हणून एकत्र बसणार आहोत आणि यातून मार्ग काढू. आमचे कार्यकर्ते माझा शब्द मोडणार नाहीत. हीच स्थिती भाजप, शिवसेना आणि आठवले यांच्याबाबतही असल्याचे म्हटले आहे.

तसेच, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत नुकतीच एक बैठक पार पडली. रात्री दीडपर्यंत बैठक चालली. गाव खेड्यातील महायुतीचा कार्यकर्त्यांचा समनव्य राहावा यासाठी ६ विभाग आणि मुंबई एक वेगळा विभाग या ६ विभागांत आमचे एकत्रित मेळावे पार पडणार आहेत. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या मेळाव्याला हजर असतील, अशी माहिती देखील अजित पवारांनी दिली आहे.

Source link

ajit pawarJarange Patil shantata rallymahayuti sarkarmaratha obc reservationreservation politicsअजित पवारांची भूमिकाजरांगे पाटील बातम्यामराठा-ओबीसी संघर्षमहायुती सरकारचा निर्णयमहाराष्ट्रातील आरक्षण राजकारण
Comments (0)
Add Comment