राज्यसभेसाठी भाजपकडून नाव फिक्स, तर काँग्रेसमधून आलेला नेता अजितदादांचा उमेदवार?

मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी निवडून द्यावयाच्या दोन जागांसाठी येत्या ३ सप्टेंबर रोजी निवडणुका होऊ घातल्या आहेत. महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले हे दोघेही लोकसभेवर निवडून गेल्याने राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झालेल्या आहेत.. दोन्ही जागा भाजपच्या असल्या तरी पण देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला आम्ही एक जागा देऊ, असं वक्तव्य केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप मार्फत ‘दाजी’ रावसाहेब दानवे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

काही दिवसांपासून रावसाहेब दानवे यांच्या सागर बंगल्यावरच्या भेटीगाठी वाढलेल्या दिसत आहेत. रावसाहेब दानवे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन मराठा मतदारांची भाजपवर असलेली नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याच समजतंय.

दुसऱ्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मार्फत माजी आमदार बाबा सिद्दीकी तसेच साताऱ्यातील नितीन पाटील यांची नावे चर्चेत आहेत. अल्पसंख्याक समाजातील व्होट बँक आपल्याकडे वळवण्यासाठी बाबा सिद्दीकी यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. शेवटच्या क्षणी बाबा सिद्धीकी यांना राज्यसभेची लॉटरी लागण्याची जास्त शक्यता आहे.
Ajit Pawar : शरद पवारांवर टीका करु नका, असं मोदींना कधीच सांगितलं नाही, चुकीच्या चर्चांवर अजितदादा चिडले
तर दुसरीकडे नितीन पाटील हे सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत. उदयनराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीत मदत करा आम्ही तुमच्या नावाचा राज्यसभेसाठी विचार करू असा शब्द अजित दादांनी त्यांना दिल्याचं समजतंय. सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांचे ते भाऊ आहेत. आमदार मकरंद पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटासोबत आहेत.

सध्या अजितदादांची जन सन्मान यात्रा सुरू आहे. फडणवीसांचे पण राज्यभर दौरे सुरू आहेत. आगामी काही दिवसातच राज्यसभेची लॉटरी नेमकी कुणाला लागेल हे कळेल!
Sharad Sonawane : आधी ‘राज’की बात, मग उद्धवना हात, आता सोडणार शिंदेंचीही साथ? जयंत पाटलांना मोहरा गवसणार?
याआधी, लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या किंवा तिकीट न मिळालेल्या नेत्यांचे नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पुनर्वसन झाले होते. पंकजा मुंडे, भावना गवळी यांची विधान परिषदेवर वर्णी लागली आहे, त्यामुळे इतरांपैकी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Source link

ajit pawarDevendra FadnavisMaharashtra Rajya Sabha Election 2024नितीन पाटीलबाबा सिद्दीकीराज्यसभा निवडणूक २०२४राज्यसभा भाजप उमेदवाररावसाहेब दानवे
Comments (0)
Add Comment