Social Media Fraud: १५० रुपयांचा मोह पडला आठ लाखांना; सोशल मीडियावरील जाहिरातीतून तरुणाची फसवणूक, काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियावर फक्त लाइक करून कमेंट करण्याच्या फसव्या जाहिरातीला बळी पडल्यामुळे एकाला आठ लाख चार हजार रुपयांचा गंडा बसला. एका ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकाची फसवणूक झाली असून, सिटी चौक पोलिस ठाण्यात दोन मोबाइल क्रमांकधारकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

फिर्यादी तारीक अहमद सादीक अहमद (वय ३५, रा. एसबीएच कॉलनी, दिल्ली गेट) यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या मोबाइल नंबरवर २१ फेब्रुवारी रोजी एका अनोळखी नंबरवरून टेलिग्रामवर एक लिंक आली. त्यात फक्त ‘लाइक करून कमेंट करा; चांगले रिव्ह्यूज द्यायचे, त्याबदल्यात प्रत्येक रिव्ह्यूजला १५० रुपये मिळतील,’ असे आमीष दाखविण्यात आले होते. फिर्यादीला हा संदेश आल्यानंतर आणखी मोठे टास्क पूर्ण करू, असे संदेश अन्य मोबाइल क्रमांकावरून आले. त्यासाठी दोन बँक खात्यांवर १५ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यावर तारीक अहमद यांनी स्टेट बँकेच्या रोजाबाग शाखेतून ऑनलाइन पैसे भरले. त्यानंतर लगेच खात्यावर २१ हजार रुपये जमा झाले. त्यानंतर पुढील टास्क पूर्ण करण्याचा सल्ला दिला. १५ हजार रुपयांना २१ हजार रुपये मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा बँकेत जात दिलेल्या खात्यावर एक लाख ३८ हजार रुपये भरले. त्यावर त्यांना तोंडी दीड लाख रुपये जिंकल्याचे आरोपींनी सांगितले. त्यानंतर फिर्यादीला पुढील दोन टास्क देण्यात आले. त्यावर फिर्यादी तारीक यांनी तीन लाख ३८ हजार रुपये ऑनलाइन पाठविले. मात्र, त्यानंतर समोरील व्यक्तीने कॉल करून सांगितले की, तीन लाख ३८ हजार नाही, तर ३ लाख २८ हजार पाठवा असे सांगितले. त्यामुळे गेलेले पैसे परत मिळविण्यासाठी त्यांनी ३ लाख २८ हजार रुपये पुन्हा ऑनलाइन खात्यावर पाठविले. त्यानंतर आरोपी एक लिंक पाठवली. त्या लिंकवर लॉगइन आयडी आणि पासवर्ड दिला. त्यात लॉगइन केल्यानंतर ११ लाख १४ हजार २०० रुपये जिंकलेले दिसून आले. मात्र, ही रक्कम काढून घेण्यासाठी कोणताच पर्याय नव्हता.
मुस्कान झूठी है…! इन्स्टावरील मैत्री महागात; मॉडेल बनण्याच्या नादात तरुणीसोबत भयंकर, भांडुपमधील घटना
तारीक यांनी फोन करून माहिती घेतली. त्यावर समोरील आरोपींनी तुम्ही चूक केली आहे; त्यामुळे त्यात पर्याय दिसत नाही. तुमचा पैसे काढण्याचा पर्याय गोठवला आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर दहा मिनिटांनी पुन्हा संपर्क केला असता, त्यांना ही रक्कम खुली करण्यासाठी सहा लाख ८० हजार रुपये भरावे लागतील आणि त्यानंतर १७ लाख ९४ हजार २०० रुपये मिळतील असे सांगितले. त्यावर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे तारीक अहमद यांनी सिटी चौक पोलिसांकडे धाव घेत फसवणूक झाल्याची तक्रार दिली.

Source link

chhatrapati sambhajinagar newscity chowk police station aurangabadsocial mediasocial media fraud casesocial media fraudsऑनलाइन व्यवहारट्रान्सपोर्ट फसवणूक
Comments (0)
Add Comment