Solapur News : भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट; काँग्रेस नेत्याचा भाजप आमदारांवर हल्लाबोल

सोलापूर : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सोलापूर शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघासाठी काँग्रेसने नवं कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांचे पुतणे आणि माजी आमदार बाबुराव चाकोते यांचे नातू सुदीप चाकोते यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस भवन येथे येऊन उत्तर आणि दक्षिण या दोन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. सुदीप चाकोते यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना, भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सोलापुरात बीजेपी नव्हे, तर डिजेपी असा उल्लेख करत सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांना टोला लगावला आहे. दोन्ही देशमुखांनी बीजेपीला डिजेपी करून टाकले आहे. बीजेपी पक्षाला दोन्ही आमदारांनी स्वतःपुरता मर्यादित ठेवल्याने त्यांच्यातील अंतर्गत वाद चाहवाट्यावर आला आहे, त्याबद्दल सोलापूर शहरात बॅनरबाजी सुद्धा सुरू आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील भाजप नाहीशी होईल अशी टीका सुदीप चाकोते यांनी केली आहे.
Uddhav Thackeray : माझ्या पायाशी कोणीतरी टरबूज ठेवलंय, ढेकनांना आव्हान नसतं, अंगठ्याने चिरडायचं; उद्धव ठाकरेंचा टोला

भाजपच्या दोन आमदारांसमोर काँग्रेसचे चॅलेंज

उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघात कन्नड भाषिक समाजाचं मताधिक्य जास्त आहे. त्यामुळे काँग्रेसने कन्नड बोलीभाषेचा उमेदवार समोर करत, भाजपच्या दोन आमदारांना धक्का दिला आहे. दक्षिण सोलापूर मतदार संघात दहा वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे सुभाष देशमुख आमदार आहेत, तर उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विजयकुमार देशमुख वीस वर्षांपासून आमदार आहेत.
Sharad Pawar : लोकसभेला भावाविरोधात प्रचार, आता विधानसभेला तुतारी फुंकण्याच्या तयारीत, भावा-बहिणीत लढाई नक्की?
दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला तगडा उमेदवार द्यावा लागेल, त्यामुळे सोलापूर शहर उत्तर मतदार संघात लिंगायत समाजाचे नेते काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी केली आहे.

दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर महाविकास आघाडीला लीड

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्या प्रणिती शिंदें यांना दोन्ही मतदार संघात मोठा मताधिक्य मिळालं होतं. उत्तर विधानसभा मतदारसंघात वीस वर्षांपासून भाजपच्या आमदाराने काम केलं नाही, सोलापुरच्या दोन्ही देशमुख आमदारांत पुत्रप्रेम जास्त असल्याने विकास झाला नाही अशी टीका यंग सेवादल ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी केली आहे.

Source link

Solapursolapur bjp congressविजयकुमार देशमुखसुदीप चाकोतेसुभाष देशमुखसोलापूर उत्तर दक्षिण मतदारसंघसोलापूर काँग्रेससोलापूर बातमीसोलापूर भाजपसोलापूर विधानसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment