… म्हणून हाकेंच्या आंदोलनाला गेलो नाही; महादेव जानकर पहिल्यांदाच बोलले

मुंबई : राज्यातले ओबीसींचे मोर्चे, मराठा आरक्षण आणि विधानसभा निवडणूक या सगळ्यावर महादेव जानकरांनी पहिल्यांदाच त्यांचं मत मांडलं आहे. लोकसभेतील पराभवानंतर त्यांची आता पुन्हा दिल्ली गाठण्याची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राज्यसभेवर महायुतीकडून आपल्याला पाठवलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, कारण, लोकसभेला दगाफटका झाला तर पुढे राज्यसभेत संधी देऊ असा शब्द महायुतीने दिला असल्याची माहिती महादेव जानकर यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत दिली. त्यामुळे महायुतीत अजित दादा किंवा भाजपची जागा जानकरांना मिळते का याकडे लक्ष तर लागलं आहे, मुलाखतीत जानकरांनी इतरही काही महत्त्वाच्या गोष्टींवर भाष्य केलं आहे.
परभणीतून अर्ज भरणाऱ्या ‘फकीर’ महादेव जानकर यांची संपत्ती किती? शपथपत्रांमधून माहिती समोर

ओबीसी व्यासपीठावर जाणार का?

ओबीसींचं एवढं मोठं आंदोलन राज्यात झालं, प्रत्येक ओबीसी नेता त्या आंदोलनाला भेट देऊन आला, मात्र महादेव जानकर हे एकाही ओबीसी व्यासपीठावर दिसले नाही. त्यामुळे तुम्ही सांगलीत होणाऱ्या ओबीसी सभेला जाणार का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “माझा पक्षच ओबीसींसाठी आहे आणि मी देशभर ओबीसींसाठीच काम करतोय. त्यामुळे एखाद्या आंदोलनात जाण्याची मला काही गरज नाही. कोणत्या आंदोलनात गेल्याने आपण ओबीसी नेता नसतो, तर कायम ओबीसींसाठी काम करणं हा माझा हेतू आहे.” दरम्यान, सांगलीत ओबीसींची महासभा होते आणि त्यासाठी राज्यभरातील नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र महादेव जानकर या सभेला जाणार नसल्याचं स्पष्ट झालंय.

परभणीत पराभव कशामुळे?

महादेव जानकर यांनी परभणीतल्या पराभवाला मुस्लीम मतांना जबाबदार ठरवलं आहे. मुस्लिमांनी साथ न दिल्यामुळे पराभव पत्करावा लागला, मात्र विधानसभेला मुस्लीम आपल्याला पुन्हा एकदा साथ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. परभणीत ठाकरे गटाचे उमेदवार बंडू जाधव यांनी महादेव जानकरांचा पराभव केला. या लढतीत थेट मराठा विरुद्ध ओबीसी अशी निवडणूक झाल्यामुळे जानकरांना ही निवडणूक जड गेली. मात्र मुस्लीम मतं या निवडणुकीत गेमचेंजर ठरली.

विधानसभेला २८८ जागांवर तयारी – जानकर

महादेव जानकर यांनी आगामी विधानसभेबाबतही त्यांचं सध्या कसं नियोजन सुरू आहे याची माहिती दिली. राज्यसभेवर संधी मिळो अथवा न मिळो, मात्र आम्ही सध्या २८८ जागांवर तयारी करतोय, असं ते म्हणाले. राज्यभरात रासपचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत आणि काही जागा महायुतीकडूनही मिळू शकतात, असं जानकर म्हणाले. मात्र पुढे काहीही होऊ द्या, आम्ही विधानसभा लढणार आहोत, असं जानकर म्हणाले.

Source link

Mahadev Jankarmahadev jankar obc reservationmahadev jankar parbhaniमहादेव जानकरमहादेव जानकर ओबीसी आरक्षण विधानसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment