पुणेकरांनो सावधान! डासांमुळे शहर आजारी; डेंगी, चिकनगुनिया, झिका, न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये वाढ

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये झालेला पाऊस, वातावरणातील चढउतार, डासांची वाढलेली उत्पत्ती या कारणांमुळे शहरात ताप, सर्दी, खोकल्यासह डेंगी, चिकनगुनिया, झिका, न्यूमोनिया, इन्फ्लूएंझा या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. शहरात फ्लूची साथ पसरल्याने सर्वच वयोगटातील नागरिकांना या आजारांचा सामना करावा लागत आहे. डास आणि वातावरणातील बदलांमु‌ळेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विषाणूजन्य आणि किटकजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.ज्येष्ठांना अधिक संसर्ग

मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. अशा रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार करावे लागत आहे. डेंगी, चिकगुनिया, झिका, इन्फ्लुएंझा, न्यूनोनिया आजरांची लक्षणे आहेत, मात्र तपासणी पॉझिटिव्ह येत नसल्याचे अनेक रुग्णांमध्ये दिसून येत आहे. मात्र, योग्य वेळेत तपासणी केल्यास तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येतो. रुग्णांची तपासणी आणि आजारांची लक्षणे बघूनच रुग्णांवर उपचार केले जातात. लक्षणे दिसून आल्यानंतर सुरुवातीच्या सात दिवसांच्या आत तपासणी केल्यास चिकनगुनियाच्या काही रुग्णांचा तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येण्याची शक्यता कमी असते. सात दिवसांनंतर ६० ते ७० टक्के रुग्णांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येतो. त्यामु‌ळे नागरिकांनी न घाबरता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत, असे डॉक्टरांनी सांगितले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच वयोगाटात डेंगी, चिकनगुनिया, ‘फ्लू’च्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ताप, गुडघे आणि सांधे दुखी, अशक्तपणा, चालता न येणे, शरीरावर सूज येणे अशी लक्षणे दिसून येत आहे. चिकनगुनिया आणि फ्लूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना बरे होण्यासाठी ८ ते १० दिवसांचा कालावधी लागत आहे. चिकनगुनिया झालेल्या काही रुग्णांचा एक सांधा तीन महिन्यांपर्यंत दुखू शकतो. फ्लूमुळे न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. – डॉ. अश्विनी जोशी, फिजिशियन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

वातावरणामुळे शहरात फ्लूसह, डेंगी, चिकनगुनिया, डेंगी, झिकाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सध्या हवेमुळे व्हारल न्यूमोनियाच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. योग्य वेळेत तपासणी केल्यास अहवाल पॉझिटिव्ह येतो. इन्फ्लूएंझा, न्यूमोनियाच्या काही रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार करावे लागत आहे. पावसामुळे डासांची संख्या वाढल्याने डेंगी, चिकनगुनियाचे प्रमाण वाढले आहे. – डॉ. प्राची साठे, संचालक, अतिदक्षता विभाग, रूबी हॉल क्लिनिक
पुण्यात डेंग्यूचा उद्रेक! वसतिगृहामध्ये १० विद्यार्थ्यांना लागण; डॉ. आंबेडकर वसतिगृहात आरोग्याचा प्रश्न गंभीर
औषधांच्या मागणीत वाढ

शहरात फ्लू आणि अन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने शहरातील रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मेडिकल दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे. ताप, सर्दी, खोकला या रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याने पॅरासिटामॉल, कफ सिरप, या औषधांना सर्वाधिक मागणी आहे. सध्या १० ते १५ टक्क्यांनी औषधाची मागणी वाढल्याचे केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिकचे सचिव अनिल बेलकर यांनी सांगितले.

आजार वाढण्याची कारणे

– सतत झालेला पाऊस
– दूषित हवा
– डासांची वाढलेली उत्पत्ती
– दूषित पाणी

Source link

pune chikungunya casespune dengue casespune viral infectionपुणे आरोग्य विभागपुणे बातम्याविषाणूजन्य आजार
Comments (0)
Add Comment