घोटाळेबाज गुप्ता बंधूंशी ठाकरेंची भेट, दिल्लीत अर्धा तास चर्चा, शिंदेंच्या खासदाराचे गंभीर आरोप

मुंबई : उद्धव ठाकरे यांचा नुकताच दिल्ली दौरा झाला. ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. या दिल्ली दौऱ्यावर ठाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी बोचरी टीका केली आहे. त्यांनी काही गंभीर आरोपही केले आहेत. ”उद्धव ठाकरे यांचा हा सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला. मला मुख्यमंत्री करा, असा कटोरा घेऊन ते दिल्लीत आले होते. पण काँग्रेसने त्यांना अजिबात भाव दिला नाही. संजय राऊत यांनी स्वतःच राजकीय महत्व वाढवणं आणि उद्धव ठाकरे यांना मी कसं नाचवू शकतो हे दाखवणारा हा दौरा होता”, अशी टीका नरेश म्हस्के यांनी यावेळी केली.”निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी हा दौरा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत अब्जावधींचा घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणणारा हा दौरा होता”, असा आरोपही नरेश म्हस्के यांनी केला. ”गुप्ता बंधू काही महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आले होते. सरकारला मुंबईत समजेल म्हणून त्यांनी दिल्लीत भेट घेतली. ७ तारखेला संजय राऊत यांनी दुपारी ही भेट घडवून आणल्याचं दिसत आहे. ही भेट कशासाठी झाली? याची सखोल चौकशी होणे गरजेचं आहे. ज्या माणसाने एका देशाला फसवलं त्याची भेट का घेतली?” असा सवाल देखील म्हस्के यांनी उपस्थित केला. ”त्यांच्या घरातील सीसीटीव्ही बंद केले असतील, तर रस्त्यावरचे सीसीटीव्ही किंवा त्यांचे फोन तपासा. आदेश गुप्ता, राजेश गुप्ता अशी त्यांची नाव आहेत. अशा व्यक्तींची पहिली चौकशी झाली पाहिजे” असं नरेश म्हस्के आक्रमक होत म्हणाले.
Ajit Pawar: ‘अर्थ’चा विरोध असूनही दादांच्या आमदाराला २ कोटींचा निधी; शरद पवारांच्या भेटीनंतर चक्रं फिरली

”एक राजकीय नेता दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतो, त्या नेत्याच्या घरी बैठक होते. त्याचा संजय राऊत यांनी पहिले खुलासा करावा. पुढे काय करायचं ते आम्ही ठरवू. मुंबई महापालिकेतून येणारे कंटेनर बंद झाले, म्हणून आता नवीन फंडासाठी हा दौरा होता का?” असा सवाल नरेश म्हस्के यांनी विचारला. ”उद्धव ठाकरे यांची बदनामी करून, त्यांना मुख्यमंत्री पदापासून बाहेर ठेवून ते ज्यांच्या पॅरोलवर आहेत, त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संजय राऊत यांना मागच्यावेळी मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांच्या भावाला मंत्री केलं नाही म्हणून त्यांनी याआधी देखील उद्धव ठाकरे यांना शिव्या शाप दिल्या आहेत” असा आरोप नरेश म्हस्के यांनी केला.

Source link

Naresh Mhaske Newsnaresh mhaske on uddhav thackeray delhi tournaresh mhaske uddhav thackeray commentsUddhav Thackeray Delhi tourउद्धव ठाकरे दिल्ली दौरानरेश म्हस्के उद्धव ठाकरे टिकानरेश म्हस्के ऑन उद्धव ठाकरे दिल्ली दौरानरेश म्हस्के बातम्या
Comments (0)
Add Comment