मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात ३१ जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीनं आता विधानसभेची तयारी सुरु केली आहे. लोकसभेच्या कामगिरीची पुनरावृत्ती करुन राज्यात सत्तांतर घडवण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. महाविकास आघाडीनं राज्यात सर्वेक्षण करुन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार महाविकास आघाडीला विधानसभेला १६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून सरकार स्थापन करण्यासाठी १४५ जागा जिंकणं गरजेचं आहे.
‘आम्ही लोकसभेला ४८ पैकी ३१ जागा जिंकल्या. याचा अर्थ ६५ टक्के जागा आम्हाला मिळाल्या. हीच सरासरी कायम राखण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यात आम्हाला यश आल्यास १८८ जागा जिंकू. पण सर्व्हेनुसार आम्हाला १६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. यापेक्षा अधिक जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल,’ असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानं टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं.
विधानसभा निवडणुकीची रणनीती आखताना महाविकास आघाडीनं राज्याची विभागणी सात भागांमध्ये केली आहे. ‘नागपूर, अमरावती भागात काँग्रेसची कामगिरी चांगली होईल असा अंदाज आहे. मराठवाड्यातही आघाडीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. तिथे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे. पश्चिम महाराष्ट्रात आम्ही शरद पवारांची राष्ट्रवादी चांगली कामगिरी करेल. सर्वच प्रमुख पक्ष विविध भागांमध्ये त्यांची जबाबदारी पार पाडतील,’ असा विश्वास शरद पवार गटातील माजी कॅबिनेट मंत्र्यानं व्यक्त केला.

चार विभागांमध्ये महाविकास आघाडी वरचढ ठरण्याची शक्यता असताना मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात महायुती पुढे राहण्याचा अंदाज आहे. या भागात भाजप, शिंदेसेना आण अजित पवार गटाची चांगली ताकद आहे. ‘लोकसभेला कोकण पट्ट्यात आमची कामगिरी चांगली झाली नाही. आता विधानसभेला चांगली कामगिरी करण्याचं आव्हान आहे. मुंबईतही भाजप, शिंदेसेनेचं मोठं आव्हान आहे. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेला काँग्रेसला काही जागा मिळाल्या. पण पक्ष अजूनही तिथे कमजोर आहे. कच्चे दुवे ओळखून त्यावर काम करण्यासाठी आता हाती फारच कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे,’ अशा शब्दांत काँग्रेस नेत्यानं सद्यस्थिती सांगितली.