विमान कोसळून ६२ जण ठार, जयंत पाटलांच्या भेटीला शिंदेंचा शिलेदार, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे यांची भेट, सोनवणे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत, जयंत पाटील आणि शरद सोनवणे यांनी एकत्र जेवण केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

२. शरद पवारांवर पुण्यातील सभेत बोलू नये, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती, मात्र त्यांच्या टीकेमुळे आम्हाला फटका बसला, असं उपमुख्यमंत्री अजित पवार अनौपचारिक बैठकीत बोलल्याचं वृत्त समोर आलं होतं, परंतु अजितदादांकडून स्पष्ट शब्दात इन्कार, बोलल्याचे व्हिडिओ पुरावे देत संताप व्यक्त

३. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकादरम्यान रविवारी मेगाब्लॉक, रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती, काही लोकल फेऱ्या रद्द, तर काही विलंबाने, पश्चिम रेल्वेवर मात्र कोणताही ब्लॉक नाही.

४. जळगाव विमानतळावरून फ्लाय ९१ विमान कंपनीची गोवा-जळगाव-हैदराबाद आणि गोवा-जळगाव-पुणे अशी विमान सेवा सुरू, २७ ऑक्टोबरपासून दररोज गोवा-जळगाव-हैदराबाद विमान सेवा, हिवाळ्यात गोवा येथे पर्यटनाला जाणाऱ्यांची चंगळ

५. आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर मृतावस्थेत आढळली, पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात भयंकर घटना, दुपारी बारा वाजताच्या सुमारास आपत्कालीन विभागाच्या चौथ्या मजल्यावर कर्मचाऱ्यांना अर्धनग्म मृतदेह सापडला, अत्याचारानंतर खून झाल्याचा संशय

६. देशातील व्यावसायिक कुटुंबांच्या यादीत अंबानी यांना अव्वल स्थान, ‘बार्कलेज-हुरून इंडियाज मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस २०२४ च्या यादीत २५.७५ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह अंबानी कुटुंबीयांना अग्रक्रम, अंबानी कुटुंबीयांची संपत्ती देशाच्या ‘जीडीपी’च्या जवळपास १० टक्के

७. बांगलादेश कापसाच्या गाठी आयात करणारा मोठा देश असल्याने अस्थिरतेचा थेट परिणाम भारतातील कापासाच्या व्यापारावर, मालाचे अनेक कंटनेर सीमेवर अडकून, भारतातून होणाऱ्या कापसाच्या तीन लाख गाठींची निर्यात संकटात

८. ब्राझीलमध्ये विमानाला भीषण अपघात, साओ पाऊलोच्या सीमावर्ती भागात ६२ प्रवाशांसह जाणारं विमान कोसळलं, सर्व प्रवाशांचा मृत्यू, अनेक घरांचंही नुकसान, कागदाच्या तुकड्याप्रमाणे आकाशातून पडणाऱ्या विमानाचा व्हिडिओ समोर

९. इराकच्या संसदेत प्रस्तावित विधेयकामुळे मोठ्या प्रमाणात संताप आणि चिंतेचे वातावरण, या विधेयकाद्वारे देशात मुलींच्या लग्नाचे कायदेशीर वय १८ वर्षांवरून नऊ वर्षे केले जाणार, न्याय मंत्रालयाने सादर केलेल्या विवादास्पद विधेयकाचा उद्देश देशाच्या पर्सनल स्टेटस कायद्यात सुधारणा करणे

१०. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा आज समारोप समारंभ, प्रसिद्ध हॉकी गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि स्टार नेमबाज मनू भाकर भारतीय दलाचे ध्वजवाहक असणार, भारतीय ऑलिम्पिक संघटनेची माहिती

Source link

Breaking Newstoday breaking newstoday headlinestop 10 headlinestop 10 headlines newstop 10 latest newsआजच्या ठळक बातम्याआजच्या बातम्याटॉप 10 ताज्या बातम्याठळक बातम्या
Comments (0)
Add Comment