लोकसभेला अजितदादांचा फायदा झाला नाही, फडणवीसांची कबुली; संघापुढे आकडेवारी मांडली, पण…

नागपूर: लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणारा भारतीय जनता पक्ष आता विधानसभेच्या तयारीला लागला आहे. गेल्या महिन्याभरापासून बैठकांचा सिलसिला सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागील महिन्याभरात तीनवेळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. शुक्रवारी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची समन्वय बैठक संपन्न झाली. त्यात लोकसभेतील अपयशासह विधानसभा निवडणुकीच्या व्यूहनीतीवर चर्चा झाली. एबीपी माझानं याबद्दलचं वृत्त दिलेलं आहे.

अजित पवारांसोबतची हातमिळवणी, लोकसभेला अनेक खासदारांना पुन्हा दिलेली संधी, त्यामुळे आलेलं अपयश या सगळ्यावर सविस्तर चर्चा करत देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेला भाकरी फिरवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप अनेक विद्यमान आमदारांची तिकिटं कापून त्यांच्या जागी नव्यांना संधी देण्याची शक्यता आहे. लोकसभेला अनेक खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली. पण नितीन गडकरी, रक्षा खडसे वगळता बाकीच्या सगळ्यांना खासदारकी टिकवता आलेली नाही. भाजपचे एकूण ९ उमेदवार विजयी झाले. पैकी ७ नवीन होते, अशी आकडेवारी फडणवीसांनी मांडली.
Uddhav Thackeray: ‘नितीश प्लॅन’ फसला, ठाकरेंसमोर काँग्रेस नेत्यांनी चुकांचा पाढा वाचला; दिल्ली दौरा फ्लॉप?
अजित पवारांना सोबत का घेतलं, एकनाथ शिंदेंसोबत सरकार स्थापन केलेलं असताना, ते स्थिर असताना अजित पवारांसोबत हातमिळवणी करण्याची काय गरज होती, असे प्रश्न संघाशी संबंधित दोन नियतकालिकांनी लेखांच्या माध्यमातून उपस्थित केले. त्या प्रश्नांना फडणवीसांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत उत्तरं दिली. ‘२०१९ मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तरीही एकट्याच्या मतांच्या टक्केवारीवर पक्ष सत्तेत येईल अशी स्थिती नव्हती. त्यामुळेच शिंदेंना सोबत घेतलं. पण दोघांची टक्केवारीही लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी पुरेशी नव्हती. याच कारणामुळे अजित पवारांसोबत युती केली,’ असं फडणवीसांनी सांगितलं.
Eknath Shinde: फडणवीसांना शह, ठाकरे अन् दादा अस्वस्थ; शिंदेंचा CMपदावरील दावा भक्कम, अनेकांचे कार्यक्रम?
‘भाजपचा मूळ मतदार संघ परिवारातील असल्यानं अनेकांना अजित पवारांसोबतची हातमिळवणी रुचली नसेल. पण राजकीय परिस्थितीचं वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं,’ ही बाब सांगताना फडणवीसांनी महत्त्वाची आकडेवारी मांडली. ‘लोकसभा निवडणुकीचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की अजित पवारांना सोबत घेतल्याचा फार फायदा झालेला नाही. लोकसभा निवडणुकीत शिंदेंना भाजपची ८९ टक्के मतं, तर भाजपला शिंदेंची ८८ टक्के मतं ट्रान्सफर झाली. पण भाजप आणि अजित पवार यांच्यामधील वोट ट्रान्सफर ५० टक्क्यांपेक्षा कमीच आहे,’ असे आकडे फडणवीसांना सांगितलं.

‘शिंदे, अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर सरकार आलं. त्यामुळे बरीच कामं करता आली. मविआ सरकारच्या काळात कामाचं सातत्य तुटलं होतं. ते पुन्हा सुरु झालं. विधानसभा निवडणुकीतही अजितदादांना सोबत घेऊन महायुती म्हणूनच पुढे जायचं ठरलंय,’ असं फडणवीसांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हला संघाचा विस्तृत विचार पराभूत करु शकतो. त्यामुळे सर्वांनी सक्रियपणे मैदानात उतरावं, असं आवाहन फडणवीसांनी केलं.

Source link

bjp ajit pawarbjp ncp allianceMaharashtra Political Newsrss bjp relationअजित पवारभाजप अजित पवार युतीभाजप राष्ट्रवादी युतीसंघ भाजपवर नाराजसंघाची भाजपवर टीका
Comments (0)
Add Comment