मुंबईकरांनो, मध्य हार्बर रेल्वेवर उद्या खोळंबा; Timetable बघूनच घराबाहेर पडा

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकात उद्या, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकवेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

मध्य रेल्वे

स्थानक – माटुंगा ते मुलुंड
मार्ग – अप आणि डाउन धीमा
वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५

परिणाम – ब्लॉक वेळेत धीम्या मार्गावरील अप आणि डाउन मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
Mumbai News: ‘एफडीए’ला ‘सुरुची’चा जाच; गुणवत्ता तपासणीच्या कारवाईला मनमानी लगाम

हार्बर रेल्वे

स्थानक – सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
मार्ग – अप आणि डाउन
वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०

परिणाम – सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशी आणि सीएसएमटी ते वांद्रे/गोरेगाव या मार्गावरील अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. कुर्ला ते पनवेलदरम्यान २० मिनिटांच्या फरकाने विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहे.

रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर ‘क्यूआर कोड’

रेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्यांवर कर्मचारी आणि प्रवाशांमधील सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्व रेल्वे स्थानकांतील तिकीट खिडक्यांवर ‘क्यूआर कोड’ यंत्रणा सुरू केली आहे. मागील पंधरवड्यात सात लाख प्रवाशांनी ७६ लाखांचे व्यवहार डिजिटल पद्धतीने पूर्ण केले आहेत.

‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाला चालना देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांत ६३२ ठिकाणी ‘क्यूआर कोड’ यंत्रणा बसवली आहे. यामुळे तिकीट आणि पास खरेदी करणाऱ्या प्रवाशांना यूपीआयच्या मदतीने व्यवहार करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे आरक्षण होणाऱ्या तिकीट खिडक्यांवर लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. रोकडरहित प्रवासी आर्थिक व्यवहारांसाठी यूटीएस अॅपचा पर्याय उपलब्ध आहे. प्रवाशांनी तिकीट खिडक्यांवरील रांगेचा त्रास टाळण्यासाठी याचा वापर करावा.

Source link

central line blockharbour line blockmaga blockMumbai localread train timetableमुंबई लोकल ब्लॉकमेगा ब्लॉकलोकल ट्रेनवाचा टाइमटेबलसेंट्रल लाईन आणि हार्बर लाईन ब्ल़ॉक
Comments (0)
Add Comment