पुण्यातील कोंढवा येथे मुस्लिम आरक्षणाच्या बाजूने जोरदार रॅली काढली

तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख

Pune Kondhwa – 9 अगस्ट 2024 क्रांती दिन निमित्ताने मुस्लिम आरक्षण समर्थन रॅली चे आयोजन करण्यात आले होते.गेले 21दिवसापासून इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप चे अध्यक्ष असलम इसाक बागवान हे मुस्लिम ख्रिश्चन समाजाला शैक्षणिक आर्थिक सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात त्याच्या लोकसंख्ये प्रमाणे आरक्षण मिळावे या करीता जातिनिहाय जनगणना व्हावी ,बार्टि,सारथी प्रमाणे मार्टि ची स्थापना करावी,( हि मागणी ७ अगस्ट रोजी मंजूर करण्यात आली) हेट स्पिच, माॅबलिंचींग सारख्या गोष्टी पासून संरक्षण म्हणून अॅट्रासिटी कायदा लागू करण्यात यावा.
१८ डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस शासनाने साजरा करावा तसेच १५ कलमी कार्यक्रम शासनाने राबवाव या मागणीसाठी कोंढवा खुर्द कोणार्क पुरम समोर सत्याग्रह सूरू असून यास काॅग्रेस पार्टि सोडून सर्व राजकीय पक्षाने पाठिंबा दिलेला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप .शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे माजी आमदार महादेव आण्णा बाबर, मुस्लिम फ्रंट चे मुन्नवर कुरेशी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर , भारतीय जनता पार्टी चे अल्पसंख्याक पुणे शहर अध्यक्ष इम्तियाज मोमिन, राष्ट्रवादी महिला आघाडी चे हलिमा शेख,गुलशन शेख तसेच विविध सामाजिक संस्था संघटना तथा पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांनी पाठिंबा नोंदविला.
आज कोंढवा येथील स्थानिक नागरिक,मदरसा, राजकिय पदाधिकारी यांनी मिळून असलम इसाक बागवान यांच्या समर्थनार्थ शितल पेट्रोल पंप ते ज्योती चौक ते सत्याग्रह ठिकाणी येत पर्यंत समर्थन रॅली चे आयोजन केले याची सांगता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.जावेदभाई कुरेशी यांनी केले यावेळी हाजी फिरोज शेख,मा.नगरसेवक रहिस सुंडके,मजहर मण्यार,मुन्नवर कुरेशी, अब्दुल बागवान,राजू सय्यद,नाजिया शेख,कांचन बलनायक, अख्तर पिरजादे,अजहर कादरी,सादिक मजाहारी,शोहेब नदाफ कुमेल रजा,अश्फाक बागवान,सादिक पानसरे, बैतूल उलम मदरसाचे तथा इनक्रेडीबल सिव्हिल सर्व्हिस अकेडमी चे विद्यार्थी तथा स्थानिक नागरिक उपस्थित होते.
यावेळी सर्व जाती धर्मातील लोकांनी तथा राजकिय पक्षाने एकवटून मुस्लिम ख्रिश्चन आरक्षण तथा संरक्षणास साथ द्यावी अशी साद यावेळी देण्यात आली.

Comments (0)
Add Comment