Indian Railway: मराठवाड्यासाठी ‘खुशखबर’, दिल्ली येणार आणखी जवळ, केंद्राकडून १७४ किमी रेल्वेमार्गाला मंजुरी

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर/जालना : मराठवाड्याला उत्तर महाराष्ट्राशी रेल्वे कनेक्शन जोडण्यासाठी अजिंठा रेल्वे कनेक्टिव्ही योजनेंतर्गत जालना-जळगाव या नवीन १७४ किलोमीटरच्या रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे सध्या मराठवाड्यातून उत्तर महाराष्ट्रमार्गे दिल्लीला जाण्यासाठी मनमाडमार्गे ३३६ किलोमीटर अंतराचा वळसा मारावा लागत होता. हे अंतर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १७४ किलोमीटरवर येईल.

‘हा रेल्वे मार्ग चार ते पाच वर्षांत पूर्ण होणार आहे. त्यासाठी ७१०६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या रेल्वेमार्गावर २३ किलोमीटर लांबीचा देशातील सर्वांत लांब बोगदा बांदण्यात येणार आहे,’ अशीही माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नांदेडमध्ये रेल्वे विभागीय कार्यालयात झालेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
Thane : बारवी धरण ओव्हरफ्लो; मुंबईनजीकच्या ‘या’ ६ महानगरपालिका आणि २ नगरपालिकांचे टेन्शन मिटले
केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण आठ प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यात जालना-जळगाव मार्गाचाही समावेश आहे. या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. जालना ते जळगाव या १७४ किलोमीटर नवीन मार्गामुळे प्रवासाचे अंतर ५० टक्के कमी होणार आहे. पूर्वी मराठवाड्यातून उत्तर महाराष्ट्राच्या जळगावपर्यंत पोहोचण्यासाठी औरंगाबाद, मनमाड, चाळीसगाव आणि जळगाव असा फेरा मारावा लागत होता. या फेऱ्यामुळे जालना-मनमाड ते जळगावचे अंतर ३३६ किलोमीटर होत होते. नवीन जळगाव ते जालना रेल्वे मार्ग झाल्यास हे अंतर १७४ किलोमीटर होणार आहे. या नवीन मार्गामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागांमधील कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ होणार आहे. यामुळे औद्योगिक विकासालाही वेग येणार आहे.
राहुल गांधी भारतीय नाहीत! सोनिया गांधी मोदी – शाहांना ब्लॅकमेल करतायत? भाजप नेत्याचा दावा

भारतातील सर्वांत लांब बोगदा

जालना ते जळगाव या नियोजित रेल्वे मार्गासाठी एकूण ९३४ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या संपादित जागेवर १७४ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग होणार आहे. हा रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी रेल्वेमार्गासाठी बोगदे तयार केले जाणार आहे. या मार्गावर २३.५ किलोमीटर लांबीचा देशातील सर्वांत मोठा बोगदा तयार केला जाणार आहे, अशीही माहिती वैष्णव यांनी दिली.

पर्यटनासोबत औद्योगिक विकास

जालना ते जळगाव नवीन रेल्वे मार्गामुळे मराठवाडा विभाग आणि उत्तर महाराष्ट्रला थेट जोडला जाणार आहे. यामुळे या रेल्वे मार्गाची पोर्ट कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. शिवाय सोयाबीन आणि कापसासारख्या कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ होईल. खत आणि सिमेंट सारख्या उद्योगांसाठी रेल्वे मार्ग झाल्याने मालवाहतूकीला चालना मिळणार आहे. याशिवाय, अजिंठा लेणींच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ रेल्वे कनेक्शनने जोडले जाणार असल्याने पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

  • जालना ते जळगाव थेट रेल्वेमार्ग
  • मार्गाची लांबी १७४ किलोमीटर
  • प्रस्तावित खर्च ७,१०६ कोटी रुपये
  • राज्य सरकार आणि रेल्वेचे समान योगदान

Source link

central governmentJalna-Jalgaon Railway linemaharashtra delhi distanceMarathwada to DelhiRailway projectकेंद्र सरकारकडून रेल्वेमार्गजालना-जळगाव रेल्वेमार्गाला मंजुरीमराठवाडा ते दिल्ली प्रवासमहाराष्ट्र ते दिल्ली प्रवास अंतरमहाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प
Comments (0)
Add Comment