महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांना ‘वारसा दर्जा’? युनेस्कोचे पथक सप्टेंबर महिन्यात भारतात येणार, ‘या’ किल्ल्यांचा समावेश

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील ११ आणि तमिळनाडू येथील एका अशा एकूण १२ गड-किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा देण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात ‘युनेस्को’चे एक पथक येत्या सप्टेंबरमध्ये भारतात दाखल होणार असून, या समितीच्या अहवालानंतर या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा देण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या समितीसमोर जी मांडणी करावी लागणार आहे, त्याकरिता सरकारच्या सांस्कृतिक विभागासह राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने जय्यत तयारी केली आहे.जागतिक वारसास्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील लष्करी भूप्रदेश या वैशिष्ट्यपूर्ण वारशाचा समाविष्ट व्हावा यासाठी भारताकडून २०२२मध्ये प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावात महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, राजगड, प्रतापगड हे ११ आणि तमिळनाडू येथील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे. या नामांकन प्रक्रियेचे ठोस समर्थन व्हावे आणि याबाबत अधिक मार्गदर्शन होण्याच्या उद्देशाने जागतिक वारसा समितीचे ४६वे अधिवेशन पहिल्याच नवी दिल्लीत येथे २१ ते ३१ जुलै या कालावधीत पार पडले होते. या अधिवेशनाचे अध्यक्ष विशाल शर्मा यांनी नुकतीच महाराष्ट्राला भेट दिली होती. या भेटीदरम्यान शर्मा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थितीत एका बैठकीत भाग घेतला होता. त्या वेळी या प्रस्तावांचे नामांकन मंजूर करण्यात आले आहे.

Iraq Marriage Law: ‘या’ मुस्लिम देशात आता मुलींचं ९ वर्ष वयातच केलं जाणार लग्न? संसदेत विधेयक सादर
त्यानंतर आता लवकरच ‘युनेस्को’ची जागतिक वारसा दर्जा समितीही राज्यात दाखल होणार आहे. सप्टेंबरच्या तिसऱ्या किंवा अखेरच्या आठवड्यात ही समिती भारतात दाखल होणार आहे. ही समिती या गडकिल्ल्यांना भेट देणार आहे. त्यानंतर या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा देण्याबाबतची अंतिम कार्यवाही सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा देण्यासाठी महायुती सरकारने यासाठी सर्व तयारी पूर्ण केल्याचे कळते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळावा, ही सामान्य शिवभक्तांची भावना आहे. हे प्रेरणादायी गडकिल्ले शौर्याचे प्रतीक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी विशेष प्रयत्न घेतले. १३ राज्यांतून ४४ प्रस्ताव आले होते. त्यापैकी आपल्या राज्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. या निमित्ताने जागतिक पातळीवरील पर्यटक महाराष्ट्रातही गडकिल्ले पाहण्यासाठी येतील. – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री

Source link

CM Eknath Shindemaharashtra fortunesco heritage listunesco world heritage siteपन्हाळा किल्लामुंबई बातम्यारायगडलोहगड किल्लाशिवनेरी किल्लासुवर्णदुर्ग
Comments (0)
Add Comment