Thane News: ”सुरुवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करणार”, मनसे नेत्याचा इशारा

मुंबई : बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गाडी अडवून त्यांच्यावर सुपारी फेकल्यानंतर दोन ठाकरेंमधील वाद आता उफाळून आला आहे. या वादानंतर लगेचच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ”सुरुवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करणार” असा सज्जड इशारा दिला. होता त्याचाच प्रत्यय ठाण्यात ककाल शनिवारी आला. बीड येथील सुपारी हल्ल्यानंतर त्याचे पडसाद आता थेट ठाण्यात उमटले आहेत. मनसेने उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शेण, नारळ आणि बांगड्या फेकल्या.उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सभा होती. या सगळ्या राड्यानंतर आता मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी प्रसार माध्यमांना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ”काल जो राडा झाला तो आमच्या माणसांनी केलाय. त्याची सर्वस्व आमची जबाबदारी आहे. सुरुवात तुम्ही केली, आता शेवट आम्ही करणार. आम्ही आरे ला कारे करू. आम्ही संजय राऊत यांच्या सारखे पळपुटे नाहीत”, दरम्यान, मनसेचे ५० ते ६० कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमास्थळी घुसल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती. या प्रकारानंतर शिवसैनिकही त्याठिकाणी जमा झाले आणि गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यानंतर गुन्हा देखील नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली. तसेच या आंदोलनानंतर सर्व कायकर्त्यांना पोलिसांनी नौपाडा पोलीस स्थानकात आणले होते. यावेळी या महिला कार्यकर्त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना व्हिडीओ कॉल केला आणि एकच जल्लोष करण्यात आला.

सुपारी आंदोलन मनसेच्या जिव्हारी! सकाळी ‘राज’कीय इशारा अन् रात्री राडा; ठाकरे बंधूंचा वाद चर्चेत

”खरं म्हणजे याची सुरुवात उभा ठाणे बीडमधून केली ही आपली संस्कृती नाही. ही आपली महाराष्ट्राची परंपरा नाही. आज त्यांनी सुरुवात केली, राज ठाकरेंच्या गाड्यांवर सुपाऱ्या टाकणं. राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा आढळून त्यांच्यावर सुपाऱ्या फेकणं हे कोणालाही आवडलेलं नाही. शेवटी ॲक्शनला रिअॅक्शन असते आणि ती आज पाहायला येथे मिळाली. परंतु याच कोणतेही समर्थन करत नाही”, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांजवळ बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधुमधील वाद नेहमीच चव्हाट्यावर असतो. आता ऐन विधानसभेच्या तोंडावर पुन्हा ठाकरे बंधूमधील वाद उफाळला आहे. राज ठाकरे यांच्या मराठवाडातील दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे गटाने राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकत सुपारी आंदोलन केले. हेच आंदोलन मनसेला जिव्हारी लागल्याने मनसेने सुद्धा थेट उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर दिले आहे. ठाण्यातील उद्धव ठाकरेंच्या सभेत मनसैनिकांनी सुद्धा थेट बांगड्या आणि टोमॅटो फेकत सभास्थळी राडा केला या सगळ्या नंतर मनसैनिक पोलिसांनी करत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हिडिओ कॉल करू संवाद साधल्यानंतर मनसैनिकांनीही जल्लोष व्यक्त केला.

Source link

sandeep deshpande newsuddhav thackeray assemblyuddhav thackeray assembly sandeep deshpandeUddhav Thackeray newsउद्धव ठाकरे बातम्याउद्धव ठाकरे सभाउद्धव ठाकरे सभा संदीप देशपांडेसंदीप देशपांडे बातम्या
Comments (0)
Add Comment