मराठा आंदोलकांनी शरद पवार यांना घेरले, बार्शीच्या सभेआधी राडा, आरक्षणावरून खडे सवाल

सोलापूर : शरद पवार यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी मराठा आंदोलकांकडून ”एक मराठा, लाख मराठा” अशी घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवार यांच्या गाडीच्या समोर येऊन काही मराठा आंदोलक घोषणा देत होते. शरद पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत. या वेळी आंदोलकांनी टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी गाडी अडवली.शरद पवार यांची गाडी कुर्डूवाडी जवळ अडवून मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. आज सकाळी ११ वाजता बार्शीत शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा तसेच नव्याने निवडून आलेल्या खासदारांचा सत्कार झाला आहे. त्यानंतर दुपारी ४ पर्यंत पवार हे बार्शीत राहणार आहेत. संध्याकाळी सोलापूर शहरातील लिमयेवाडी येथे भटके, विमुक्त, ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आलाय. त्यालाही उपस्थित राहतील.
Sangli Firing: दुकानात घुसला अन् बंदूक ताणली पण… सांगलीत ठाकरेंच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न

शरद पवार काय म्हणाले?

मनसेचे तालुका प्रमुख सागर लोकरे आणि मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली होती. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी केली. आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर पवारांनी कारचा दरवाजा उघडला आणि आंदोलकांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर पवारांनी यावेळी ”माझा आरक्षणाला पाठींबा आहे”, असे म्हणाले. त्यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी सोडली. यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या.

भाजपा खासदार अशोक चव्हाण यांना एका कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी आरक्षणाबाबत जाब विचारला. ”आरक्षणासाठी तुम्ही काय केलं?, आरक्षण देण्यासाठी इतका वेळ का लागतो? असा सवाल आंदोलकाने केला आहे. आमच्या योद्धाची प्रकृती खालावत आहे, आरक्षण वेळेत दिलं तर विधानसभेत तुमच्यासोबत नाही तर तुमच्या विरोधात” असे आंदोलकांनी सुनावलं आहे. काल रात्री मुगट या गावात कार्यक्रमासाठी अशोक चव्हाण गेले होते. यावेळी हा प्रकार घडला. अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघात सातत्याने मराठा आंदोलकांकडून चव्हाण कुटुंबीयांचा विरोध होत आहे.

Source link

maratha protester sharad pawar car stoppedSharad Pawarsharad pawar car stoppedsolapur sharad pawar newsमराठा आंदोलक शरद पवार गाडी अडवलीशरद पवारशरद पवार गाडी अडवलीसोलापूर शरद पवार बातम्या
Comments (0)
Add Comment