कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये; सुप्रिया सुळेंचा मोबाईल हॅक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वत: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबतची माहिती दिली. त्यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप हॅक झालं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

रविवारी (११ ऑगस्ट) दुपारी १ वाजताच्या सुमारास सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला. यामध्ये त्यांनी कार्यकर्ते आणि जनतेसाठी एक संदेश दिला. अत्यंत महत्त्वाचे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मोबाईल आणि फोन हॅक झाला असल्याचं सांगितलं. तसेच, कोणी त्यांना फोन किंवा मेसेज करु नये असंही त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंनी सोशल मीडिया पोस्टमध्ये काय लिहिलं?

“*** अत्यंत महत्वाचे *** माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. – सुप्रिया सुळे”, असं त्यांनी या पोस्ट मध्ये लिहिलं.

नेमकं काय झालं?

माझा फोन हॅक झाला आहे. माझा फोन माझ्या बरोबरीने दुसरे कोणीतरी चालवत आहे. हॅक झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, माझं व्हाट्सअप चालू होत नव्हते. म्हणून मी जयंत रावांना म्हटले, माझा फोन चेक करा तेव्हा त्यांनी ‘नमस्कार’ असा व्हाट्सअप ला मेसेज केला. त्यावेळी मी काहीही न करता जयंतराव यांना ‘नमस्कार’ असा रिप्लाय दिला गेला. त्यानंतर मी माझा मोबाईल स्विच ऑफ करून सिम बाजूला काढले. त्यानंतर पुन्हा मी त्यांना व्हाट्सअप ला मेसेज करण्यास सांगितले. त्यावेळेस हॅक करणाऱ्याने मेसेज केला की ‘तुम्ही कुठे’ आहात.तर दुसऱ्या एकाने नमस्कार ताई असा मेसेज केला असता, त्यांनाही नमस्कार ताई असा मेसेज आला.

त्यानंतर त्यांनी मेसेज केला की, आम्ही तुमची वाट बघत आहोत त्यावर पुन्हा मेसेज आला की, ‘आयकॉलयू लेटर’ माझा फोन बंद असताना सिम काढले असताना तरी सुद्धा माझ्या फोनवरून फोन गप्पा मारतोय हे अद्याप समजायला मार्ग नाही. याबाबत मी पोलीस कंप्लेंट केले आहे. अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला मोबाईल हॅक झाल्याची माहिती जाहीर सभेत दिली.

Source link

ncp sharad pawar newsrashtravadi congressSupriya Sulesupriya sule marathi batmyasupriya sule mobile hackखासदार सुप्रिया सुळे मोबाईलसुप्रिया सुळे बातम्यासुप्रिया सुळे मोबाईल हॅकसुप्रिया सुळे सोशल मीडिया पोस्ट
Comments (0)
Add Comment