‘शेअर ट्रेडिंग’द्वारे कोट्यवधींचा गंडा; समृद्ध भारत ट्रेडिंगच्या चालकावर गुन्हा दाखल, काय प्रकरण?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शेअर बाजारात गुंतवणूक करून दर महिन्याला दहा टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील २० गुंतवणूकदारांचे एक कोटी २८ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फसवणुकीची व्याप्ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह नाशिक, पुणे जिल्ह्यासह राज्याभरात पसरली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणी योगेश मनसुबराव हिवार्डे (वय ३८, रा. जिकठाण, ता. गंगापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मिटमिटा येथील समृद्ध भारत ट्रेडिंग कंपनी माध्यमातून मालेगाव (जि. नाशिक) येथील नरेंद्र बाळू पवार व शुभांगी नरेंद्र पवार या पती-पत्नीने क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीची माहिती या भागातील गुंतवणूकदारांना दिली होती. वीस महिन्यांत दिलेली रक्कम दुप्पट; तसेच तोपर्यंत मूळ रक्कमेला १० टक्के महिनाला व्याज देण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून अनेकांनी पैसा गुंतवणुकीस पुढाकार घेतला. त्यांना सहा महिने दिलेल्या तारखेलाच १० टक्के व्याजाची रक्कम दिली. त्यामुळे या पवार दामप्त्यावर गुंतवणुकदारांचा विश्वास बसला. या प्रकरणात योगेश हिवार्डेसह अन्य १९ जणांनी एक लाख ते ११ लाख रुपयांच्या दरम्यान पैसे गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकदारांना एकूण एक कोटी २८ लाखांचा गंडा घातल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

Social Media Fraud: १५० रुपयांचा मोह पडला आठ लाखांना; सोशल मीडियावरील जाहिरातीतून तरुणाची फसवणूक, काय घडलं?
या प्रकरणात योगेश हिवार्डे याच्या तक्रारीवरून नरेंद्र बाळू पवार, प्रफुल्ल कांबळे, शुभांगी पवार आणि स्वप्नील ठाकरे व संदीप मुळे अशा पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यातही गुन्हा

समृद्ध भारत कंपनीच्या माध्यमातुन पुण्यातील गुंतवणूकदारांनाही गंडा घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील चंदननगर पोलिस ठाण्यात समृद्ध भारत ट्रेडिंग कंपनीचा मुख्य नरेंद्र बाळू पवार व पत्नी शुभांगी पवार यांच्यासह गुंतवणूकदारांकडून रक्कम जमा करण्यासाठी टीम लीडर म्हणून प्रफुल्ल कांबळे, संदीप मुळे (दोघेही रा. पुणे) आणि स्वप्नील ठाकरे (रा. मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

Source link

chandannagar police stationchavani police stationcripto currencyinvestment fraudssamruddha bharat trading companyshare marketshares investment fraudछत्रपती संभाजीनगर बातम्याशेअर बाजारात गुंतवणूक
Comments (0)
Add Comment