राज ठाकरेंच्या नादाला लागू नका, आज ठाण्यात, उद्या तुमच्या घरापर्यंत येऊ, मनसे नेत्याचा इशारा

डोंबिवली: विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद उफाळून आला आहे. राज ठाकरे यांच्या मराठवाडातील दौऱ्यादरम्यान ठाकरे गटाने राज ठाकरे यांच्या ताफ्यावर सुपारी फेकत आंदोलन केले. या घटनेने मनसैनिक संतापले आणि त्यांनी यांचं प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण आणि बांगड्या फेकल्या. यावरूनच शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला डिचवले जात आहे.

डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेनी रोजगार मेळावा भरवला होता. यावेळी शेकडो तरुणांना नोकरी देण्यात आली. यावेळी शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांना ठाण्यातील राड्यावर प्रश्न विचारला असता त्यानी टोला लगावत सांगितले की, जसं पेरावे तसे उगवले जाते. कोणाची सुपारी, कोणाचा नारळ, यांच्यामध्ये आम्हाला रस नाही. सामाजिक करत पुढे जाणं, एवढंच बाळासाहेबांनी शिकवलं. त्याप्रमाणे आम्ही कामं करतोय, असा टोला लांडगे यांनी लगावला.
Thane Shivsena Vs MNS: उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेण अन् बांगड्या; राज ठाकरेंचा व्हिडिओ कॉल अन् पोलीस ठाण्यातच मनसैनिकांकडून जल्लोष
दरम्यान, राड्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया दिले आहे. खरं म्हणजे याची सुरुवात उबाठाने बीडमधून केली. ही आपली संस्कृती नाही, ही आपली महाराष्ट्राची परंपरा नाही आज त्यांनी सुरुवात केली. राज ठाकरेंच्या गाड्यांवर सुपाऱ्या टाकणं, राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा आढळून त्यांच्यावर काय काय करणं हे तर कोणालाही आवडलेलं नाही आणि शेवटी ॲक्शनला रिएक्शन असते आणि ती आज पाहायला येथे मिळाली परंतु याच कोणतेही समर्थन करत नाही. उबाठाच्या ठाणे महिला जिल्हाध्यक्ष अनिता बिर्जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांजवळ बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राज ठाकरेंच्या नादाला लागू नका, आज आम्ही गडकरी रंगायतनपर्यंत पोहोचलोय – मनसे नेते अविनाश जाधव

काल मराठवाडा दौऱ्यावेळी पाच-सहा शिवसैनिकांनी राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वाहनांवर सुपाऱ्या फेकल्या. ठाण्यात मनसैनिकांनी त्याला उत्तर दिलं. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील १६-१७ गाड्या फोडण्यात आल्या. उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण, बांगड्या फेकण्यात आल्याचे अविनाश जाधवांनी म्हटलं. ठाण्यात जे झालं ते लाईव्ह सुरु होतं, ते सर्वांनी पाहिलं. राज ठाकरेंच्या वाट्याला कोणी गेलं तर त्याचं जशास तसं उत्तर देण्यात येईल, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. राज ठाकरेंच्या नादाला लागू नका. आज आम्ही गडकरी रंगायतनपर्यंत पोहोचलोय. उद्या आम्ही तुमच्या घरपर्यंतही येऊ. पुन्हा राज ठाकरेंवर बोलल्यास किंवा त्याच्या आजूबाजूला फिसल्यास घरात घुसून मारू असा इशारा अविनाश जाधवांनी ठाकरे गटाला दिला आहे. माझ्यासारखे हजारो वेडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतात. राज ठाकरेंसोबत असं काही करण्याचा विचार जरी त्यांच्या कोणत्या कार्यकर्त्याने केला तरी त्याला घरात घुसून मारु, असे अविनाश जाधव म्हणाले.

Source link

attack on uddhav thackeray carmns raj thackeray newsshiv sena vs mns radathane shivsens vs mnsउद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर शेणठाणे राडामनसे कार्यकर्तेराज ठाकरे ताफ्यावर सुपाऱ्याशिवसेना विरुद्ध मनसे राडा
Comments (0)
Add Comment