देशमुख यांनी त्यांच्या अधिकृत X खात्यावर लिहिले, वा… देवेंद्र फडणवीस जी! मी १५ दिवसापुर्वी, तुम्ही ३ वर्षापुर्वी कसे उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना तुरुगांत टाकण्यासाठी कटकारस्थान रचले होते, ते मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणले. आता तुम्ही माझ्यावर आरोप करण्यासाठी सचिन वाझे जो देशद्रोहाच्या आणि २ खुनाच्या गुन्ह्यांमध्ये ३ वर्षापासुन जेलमध्ये आहे, तसेच परमबीर सिंह ज्याने ३ वर्षापुर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कार्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवले आणि नंतर स्कार्पिओ गाडीच्या मालकाची हत्या करणे या दोन्ही गुन्ह्याचे सुत्रधार आहेत. अश्या आरोपी परमबीर सिंह याला पुढे केले आहे.
परमबीर सिंह यांचे आरोप निराधार असल्याचे सांगून देशमुख पुढे म्हणाले, आता दोघेही देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन पोपटा सारखे बोलत आहे. वरील दोन्ही प्रकरणाचा मुळे सुत्रधार परमबीर सिंह असल्यामुळे आम्ही त्याला ३ वर्षापुर्वी निलंबीत केले. त्याला ३ वर्षापुर्वी केंद्रीय एजंन्सी कडुन अटक होणार होती. पण तो भाजपाला शरण गेला आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आरोप करीत आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्ही १५ दिवस का शांत होता आता माझ्यावर आरोप करावयाचे तुम्हाला आठवले काय ?
परमबीर सिंहांचे आरोप काय?
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर भाजप नेत्यांना अटक करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केल्याची माहिती आहे. यासोबतच देशमुख हे १०० कोटींच्या वसुली प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचेही सांगण्यात आले. परमवीर सिंह यांचा हा आरोप खरा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. यासोबतच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आपल्याला चार वेळा अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला.