मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी, ती कधीही बंद होणार नाही : आदिती तटकरे

डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेविषयी सध्या विरोधक अपप्रचार पसरवत आहेत. पण जे या योजनेविषयी अपप्रचार करत आहेत तेच लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघांमध्ये सर्वात जास्त फॉर्म भरून घेत आहेत. कारण त्यांना माहित आहे की ही योजना बंद पडणार नाही. त्याचबरोबर या योजनेचा फायदा सर्वच महिलांना होणार आहे. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा. कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना कधीही बंद होणारी नाही, असे वक्तव्य राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.

परभणी येथे राजलक्ष्मी लॉन्स येथे महिलांचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री अदिती तटकरे या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार राजेश विटेकर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष भावना नखाते, युवकचे जिल्हाध्यक्ष रोहन सामाले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यांमध्ये त्रुटी; १५ लाख लाभार्थ्यांची बॅंक खाती चुकीची किंवा बंद

अजितदादांनी बहिणींना प्राधान्य दिले, विरोधकांना खटकतंय

पुढे बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाला ४६ हजार कोटी लागणार आहेत. अर्थ विभागाने तो निधी आम्हाला वितरीत केला आहे. १७ तारखेचा पहिल्या हप्त्यासह पुढच्या सहा महिन्याच्या निधीची तरतूद आम्ही केली आहे. त्यानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पात आणखी निधीची तरतूद केली जाईल. अजितदादांनी दहावा अर्थसंकल्प सादर केला त्यात महिलांना प्राधान्य दिले, हे विरोधकांना खटकत असावे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
रक्षाबंधनपूर्वीच बहि‍णींना मिळणार ओवाळणी! लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता ‘या’ तारखेला मिळणार

योजनेबद्दल आदिती तटकरे म्हणाल्या…

लाडकी बहीण योजनेची नावनोंदणी आताही सुरू आहे. अडीच कोटी महिलांना योजनेचा लाभ देण्याचा अंदाज काढला होता. नोंदणीचा आकडा आजच्या घडीला दीड कोटी पर्यंत पोहोचेल. योजनेची घोषणा झाली तशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र १७ तारखेला महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडल्यानंतर नोंदणी अधिक वाढेल. राज्य शासनाने आणलेली ही योजना चालूच राहणार आहे. पहिल्या टप्प्यातील नोंदणी ३१ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. दररोज पाच ते सहा लाख अर्ज अपलोड होत आहेत. ॲप आणि पोर्टलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन सुरू आहे. महिलांच्या अकाउंटला योजनेचा निधी जावा यासाठी काळजी घेतली जात आहे. ॲप आणि पोर्टलवरील अर्जांची छाननी केली जात आहे. दोन्ही ठिकाणी आलेल्या अर्जातील एक अर्ज बाजूला केला जाणार आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासन, महिला भगिनींना शब्द, दादांचा नाशिकमध्ये वादा

मंजूर अर्जांची संख्या १ कोटी ३५ लाखाच्या वर गेली

राज्य शासनाची ही पहिलीच योजना आहे की एका वेळेला एक कोटी लोकांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जाणार आहे. राज्यात १ कोटी ४५ लाखांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत. मंजूर झालेल्या अर्जांची संख्या १ कोटी ३५ लाखाच्या वर गेली आहे, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.

शासकीय महिला कर्मचाऱ्यांनाही मिळणार योजनेचा लाभ

शासनाची ही एकमेव योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांना देखील लाभ मिळणार आहे. महिला व बालविकास विभाग अंतर्गत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार असल्याने ही योजना अत्यंत प्रभावशाली असल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या.

Source link

Aditi TatkareAditi Tatkare on ladki bahin yojnaladki bahin yojanamukhyamantri mazi ladki bahin yojanaआदिती तटकरे लाडकी बहीण योजनालाडकी बहीण योजनालाडकी बहीण योजना बातम्या
Comments (0)
Add Comment