विलासरावांनी तुम्हाला CM पदाची संधी दिली, तुम्ही साथ का सोडली? नांदेडमध्ये जाऊन विचारणा

अर्जुन राठोड, नांदेड : महाराष्ट्रात जेव्हा मुख्यमंत्री बदलाच्या हालचालीला वेग आला होता तेव्हा स्व. नेते विलासराव देशमुख यांनी त्यांचे वजन मराठवाड्याचे सुपुत्र म्हणून तुमच्या पारड्यात टाकले. जनतेचीही तुम्हाला साथ होती. असे असताना तुम्ही काँग्रेसची साथ का सोडली? असा प्रश्न माजी मंत्री, काँग्रेस नेते अमित चव्हाण यांनी भाजपवासी झालेले अशोक चव्हाण यांना विचारला.

रविवारी नांदेडमध्ये काँग्रेसची विभागीय बैठक पार पडली. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपला लक्ष्य केले. आमदार अमित देशमुख यांच्या टीकेचा रोख मात्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर होता. कधी काव्यात्मक फटकेबाजी करत तर कधी गतकाळातील प्रसंगाची आठवण करून देत अमित देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली.
‘अशोका’ची पतझड पण ‘वसंत’ फुलला, विलासराव स्टाईलने फटकेबाजी, अमित देशमुखांचं भाषण चर्चेत

विलासरावांनी अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली

तुम्ही दोन वेळेस मुख्यमंत्री पदावर होतात. जनतेने तुमची साथ सोडली नव्हती. मग तुम्ही काँग्रेस पक्षाची साथ का सोडली? असे आक्रमकपणे अमित देशमुख यांनी विचारले. स्व. शंकरराव चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांना ताकद दिली होती. हे विलासराव देशमुख विसरले नव्हते. महाराष्ट्रात जेव्हा मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग आला होता, तेव्हा स्व. विलासराव देशमुख यांनी स्वतः मोठं मन करत अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. एवढचं नाही तर नांदेडला दोन वेळेस मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. जनतेने तुमची साथ सोडली नाही, तुम्ही का साथ सोडली? असे अमित देशमुख यांनी विचारले.

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर प्रहार

भाजपकडून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर आमदार अमित देशमुख यांनी भाजपावर सडकून टीका केली. सत्ताधिकाऱ्यांनी मराठवाड्यात घर फोडले, लातुरमध्ये तर चक्क देवघर फोडले, पण देव्हाऱ्यातील देव आमच्या सोबत असल्याचे देशमुख म्हणाले. विलासराव देशमुख यांना राजकारणात आणण्याचे काम शिवराज पाटील यांनी केले आणि त्यांना मोठे करण्याचे काम स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी केलं. हे आम्ही आजही विसरलो नाहीत. महाराष्ट्रात परिवर्तन आणण्याचे काम आता आम्ही करत आहोत, असे देशमुख म्हणाले.

Source link

Amit DeshmukhAmit Deshmukh Nanded SpeechAshok ChavanMaharashtra Vidhan Sabha ElectionNanded Congress MeetingVidhan Sabha Election 2024अमित देशमुखअमित देशमुख अशोक चव्हाण टोलाअमित देशमुख नांदेड भाषणअशोक चव्हाण
Comments (0)
Add Comment