८४ वर्षाचा योद्धा, नादाला लागू नका! नाहीतर पाठ लावूनच सोडतील; राष्ट्रवादीचा ‘राज’कीय इशारा

बारामती, दीपक पडकर : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या १७० ते १७५ जागा निवडून येतील. तुम्ही सुप्रिया सुळेंसारख्या रणरागिनीला खासदार बनवून संसदेत पाठवलं आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनात त्यांनी कुणाचीही ठेवली नाही. सगळ्यांची..xxx..असं म्हणत हातवारे करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी विरोधकांवर टीका केली. शिवस्वराज्य यात्रा आज बारामतीत दाखल झाली होती. जयंत पाटील बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, युवा नेते युगेंद्र पवार यांच्यासहअनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

पवार साहेबांच्या एकदा डोक्यात बसलं की मग काय खरं नाही. त्यांच्याकडे जिद्द एवढी प्रचंड आहे की, वयाचा अडसर त्यांच्यासमोर येत नाही. त्यांनी एकदा मनात घेतलं की, तर ते पाठ लावूनच सोडतात. त्यामुळे शहाण्या माणसाने त्यांना डिवचू नये, एकदा जागं केलं.. आणि आवाहन दिल..की पवार साहेब ते तडीस नेतात..असा ८४ वर्षांचा योद्धा तुम्ही सर्वांनी हाताच्या फोडासारखा जपला. त्यामुळे तुम्हा बारामतीकरांचे महाराष्ट्रावर लाख मोलाचे उपकार आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार, शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्याच दिवशी जयंत पाटलांचा हुंकार

लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही चंद्र जरी मागितला तरी ते देण्याच्या तयारीत आहेत. असं म्हणत लाडक्या खुर्चीसाठी पडेल ते म्हणाल ते करायला तयार आहेत. कारण त्यांना लोकसभेच्या निकालावरून लक्षात आले आहे की, सत्ता जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्व काही लाडके होऊ शकते. असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडले. पुढे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे काम तुम्ही निवडून दिलेले महाविकास आघाडीचे शिलेदार करत आहेत.

भारतीय जनता पक्षामध्ये ‘राम’ राहिला नाही

आज भारतीय जनता पक्षामध्ये राम राहिला नाही. तो राम पार्टी सोडून गेला आहे. जिथे जिथे रामाची देवळे आहेत. तिथे तिथे भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे नीतिमत्तेने वागले तर देव राहतो. मात्र अनितीचा पाठपुरावा सुरू केला.भ्रष्ट मार्गाने पुढे जायचा प्रयत्न केला.ती नीती तुम्हाला माफ करत नाही.असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

Source link

jayant patil on raj thackerayMNSncp sharad pawarraj thackeray on sharad pawarजयंत पाटीलराज ठाकरेशरद पवारशिव स्वराज्य यात्रासुप्रिया सुळे
Comments (0)
Add Comment