नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास अखेर मंजुरी; उपमुख्यमंत्र्यांनी ट्विट करत दिली माहिती, असा आहे प्रकल्प…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंजुरी दिल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी एक्सवरून केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नाशिक आणि जळगाव येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून या प्रकल्पामुळे या नदी खोऱ्यातून १०.६४ टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे. मुख्य म्हणजे, या प्रकल्पामुळे ४९ हजार ५१६ हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.

‘वैनगंगा-नळगंगापाठोपाठ आता नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पालाही राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. मी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा मनापासून आभारी आहे. या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून १०६४ टीएमसी पाणीवापर प्रस्तावित असून त्याचा लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ४९,५१६ हेक्टर क्षेत्राला होणार आहे. सुमारे ७०१५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने हे आणखी एक ऐतिहासिक पाऊल ठरेल,’ असे फडणवीस यांनी नमूद केले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासन, महिला भगिनींना शब्द, दादांचा नाशिकमध्ये वादा
असा आहे प्रकल्प

नार-पार या नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा तालुक्यांतील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्याची ही योजना आहे. यासाठी साधारण साडेसहा ते सात हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव या तालुक्यांना, तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, धरणगाव आदी तालुक्यांतील सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. धुळे जिल्ह्यातील काही भागांत याचा लाभ होणार आहे. यामुळे साधारत: अडीच लाख हेक्टर सिंचनक्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. या योजनेतून पश्चिमी वाहिनी नार-पार-गिरणा या नदीखोऱ्यातून १०.६४ टीएमसी पाणीवापर प्रस्तावित आहे.

जलचिंतनचे राजेंद्र जाधव यांची भूमिका
नार-पार मान्यतेचे स्वागत

नाशिक : नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांनी तत्वत: मान्यता दिल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करतानाच महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी हे महाराष्ट्रासाठीच वापरण्याकरीता प्रकल्पात काही सुधारणा आवश्यक असल्याची भूमिका या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणाऱ्या जलचिंतन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अभियंते राजेंद्र जाधव मांडली आहे.

Source link

good news for jalgaon farmergood news for nashik farmerNar Par Girna Link ProjectNar Par Girna River Interlinking Projectमुंबई बातम्यावैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पसी. पी. राधाकृष्णन
Comments (0)
Add Comment