पुतण्याच्या जॅकेटचा कलर बदलला, मतं मिळतील का? शरद पवार यांचे मिश्किल उत्तर

पुणे : लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यातून सावरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी सुरू केलेल्या ‘जनसन्मान यात्रे’त त्यांच्या विशेष पेहरावाची चर्चा होत आहे. एरवी पांढऱ्या शुभ्र झब्बा पायजम्यात दिसणाऱ्या अजित पवार यांनी सदऱ्यावर अचानक गुलाबी जॅकेट चढवले आहे. कधीकाळी जॅकेट घातल्यावर काय शिंगे फुटतात काय? असा प्रश्न विरोधकांना डिवचण्यासाठी ते विचारत. पण विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर असल्याने राजकीय रणनीतीकाराच्या सल्ल्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाची ओळख गुलाबी रंग ठसविण्याचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. महिलांचा आवडता गुलाबी रंग पक्षाला लाभदायक राहील, असे त्यांना सांगितल्याने अजितदादांनीही जवळपास डझनभर गुलाबी रंगाची जॅकेट्स शिवून घेतले आहेत. अजित पवार यांच्या बदलत्या रंगावरून त्यांचे काका, देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला.

शरद पवार यांना मराठवाडा दौऱ्यात मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. मराठा आरक्षणावर तुमची भूमिका काय आहे? हे स्पष्ट करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. याच पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाचे रमेश केरे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर चर्चेचा तपशील सांगण्यासाठी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
Ajit Pawar : शरद पवारांवर टीका करु नका, असं मोदींना कधीच सांगितलं नाही, चुकीच्या चर्चांवर अजितदादा चिडले

शरद पवार यांचे मिश्किल उत्तर, पत्रकारांमध्ये हास्यकल्लोळ

आक्रमक, रांगडे दिसणारे अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये वेगळ्याच ढंगात पाहायला मिळत आहेत. गुलाबी जॅकेट परिधान केल्याने महिलांची मते मिळतील असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. शरद पवार यांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराने निळ्या रंगाचा शर्ट घातला होता. त्यावरून पवार म्हणाले, तुम्ही निळ्या कलरचे शर्ट परिधान केले आहे. तुमच्याकडे महिला आकर्षित होतील का…? पवारांच्या या उत्तराने पत्रकारांमध्ये हास्यकल्लोळ झाला.

दादांना फायदा होणार नाही, शरद पवार यांचे अप्रत्यक्ष उत्तर

दरम्यान, शरद पवार यांनी दिलेल्या उत्तराने अजित पवारांच्या बदलत्या रंगाच्या भूमिकेचा त्यांना फायदा होणार नाही, असेच पवारांनी अप्रत्यक्ष सुचविले आहे.

Source link

Ajit Pawar pink Color JacketMaratha Reservation rowSharad PawarSharad Pawar on Ajit Pawar pink Color Jacketsharad pawar pune press conferenceअजित पवार गुलाबी रंग जॅकेटशरद पवार अजित पवार गुलाबी रंग जॅकेटशरद पवार पुणे पत्रकार परिषद
Comments (0)
Add Comment