सामान्यांचं बजेट गडबडलं! पालेभाज्यांचे दर वाढले; मेथीची जुडी खातेय ‘भाव’, जाणून घ्या भाज्यांचे दर…

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: पालेभाज्यांमध्ये पुन्हा काहीशी दरवाढ झाली आहे, तर फळभाज्यांचे दर मागच्या काही आठवड्यांच्या तुलनेत बऱ्यापैकी स्थिर असल्याचे रविवारी (११ ऑगस्ट) दिसून आले. पाऊस, चिखलामुळे शेतातील पालेभाज्या काढणे त्रासदायक झाल्याने आवक घटली आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या दरा किंचित वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

पालेभाज्यांचे दर असे…

काही आठवड्यांपूर्वीपर्यंत बहुतांश पालेभाज्या सरासरी १० रुपये जुडीप्रमाणे उपलब्ध होत्या. मधले काही दिवस चक्क पाच रुपये जुडीप्रमाणेही काही पालेभाज्यांची विक्री झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता केवळ कोथिंबीर १० रुपये जुडीप्रमाणे उपलब्ध आहे आणि तीदेखील छोडी जुडी १० रुपयांना आहे. त्याशिवाय पालक १५ रुपये, तर सर्वांची आवडती मेथी २० रुपये जुडीप्रमाणे विकत घ्यावी लागत आहे. करडई, चुकादेखील १० ते १५ रुपये जुडीप्रमाणे विकत घ्यावा लागत आहे. चिवळ बाजारात उपलब्ध असून, २५० ग्रॅममागे २० रुपये असा त्याचा भाव आहे.

फळभाज्यांचे दर स्थिर

गेल्या काही आठवड्यांपासून बहुतांश फळभाज्यांचे दर तसे स्थिर आहेत. त्यानुसार २५० ग्रॅममागे दोडके २५ रुपये, गिलके २५ रुपये, वांगी २० रुपये, गवार २५ रुपये, भेंडी २० रुपये, सिमला मिरची २५ रुपये, हिरवी मिरची २० रुपये, काकडा मिरची ३० रुपये, कारले २० ते २५ रुपये, चवळी २५ ते ३० रुपये, काकडी २० रुपये, फुलकोबी २५ रुपये, पत्ताकोबी २० रुपये, पडवळ ३० रुपये, गाजर २० रुपये, लिंबू ३० रुपये याप्रमाणे फळभाज्यांची किरकोळ विक्री होत आहे. अजूनही बटाटे व कांद्याचा भाव ५० रुपयांवर स्थिर आहे.

Social Media Fraud: १५० रुपयांचा मोह पडला आठ लाखांना; सोशल मीडियावरील जाहिरातीतून तरुणाची फसवणूक, काय घडलं?
टोमॅटोत खूप दरवाढ नाही आणि ६० ते ७० रुपये किलोप्रमाणे टोमॅटोची विक्री होत आहे. त्याचप्रमाणे लसूण २५० ग्रॅममागे १०० ते १२० रुपये व आले ५० रुपये याप्रमाणे खरेदी करावा लागत आहे. अर्थात, फळभाज्यांचे भाव स्थिर असले तरी मागच्या किमान पाच ते सहा महिन्यांपासून तरी हे भाव पूर्वीच्या तुलनेत चढेच आहेत.

Source link

leafy vegetable rates hikemethi vegetablevegetable price todayvegetable rates hikeछत्रपती संभाजीनगर बातम्यापालेभाज्यांच्या दरात वाढफळभाज्यांचे दर
Comments (0)
Add Comment