उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार? गुप्ता बंधू भेट चर्चेत; राऊतांच्या घराचे CCTV तपासा शिंदे गटाची मागणी

मुंबई : उद्धव ठाकरे यांचा नुकताच दिल्ली दौरा पार पडला आहे. दौऱ्यानिमित्त दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ते राहुल गांधी, सोनिया गांधी यांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. मात्र उद्धव ठाकरेंचा दौरा आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे खासदार नरेश महस्के यांनी बोचरी टीका केली आहे होती. महस्के म्हणाले, ”उद्धव ठाकरे यांचा हा सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला. मला मुख्यमंत्री करा, असा कटोरा घेऊन ते दिल्लीत आले होते. पण काँग्रेसने त्यांना अजिबात भाव दिला नाही. संजय राऊत यांनी स्वतःच राजकीय महत्व वाढवणं आणि उद्धव ठाकरे यांना मी कसं नाचवू शकतो हे दाखवणारा हा दौरा होता. निवडणुकीचा फंड गोळा करण्यासाठी हा दौरा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत अब्जावधींचा घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधू यांची भेट घडवून आणणारा हा दौरा होता, असा आरोपही नरेश म्हस्के यांनी केला होता त्यामागोमाग आता संजय निरुपम यांनी सुद्धा हाच आरोप ठाकरेंवर लगावला आहे.

निरुपम म्हणाले की, ७ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी संजय राऊत यांच्या दिल्लीतील शासकिय निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी गुप्ता बंधूंपैकी एकाची भेट घेतली. याबाबत संजय राऊत यांच्या घरातील सीसीटीव्ही तपासणे आवश्यक आहे. उबाठा जेव्हा दिल्लीत जातात तेव्हा हॉटेल ताज किंवा मौर्य हॉटेलमध्ये वास्तव्य करतात पण यावेळी ते संजय राऊत यांच्या शासकीय निवासस्थानी का थांबले होते? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
घोटाळेबाज गुप्ता बंधूंशी ठाकरेंची भेट, दिल्लीत अर्धा तास चर्चा, शिंदेंच्या खासदाराचे गंभीर आरोप

दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे अजय गुप्ताला भेटले का ? असा सवाल संजय निरुपम यांनी केला. अजय गुप्ता बिझनेसमन आणि कुख्यात गुंड आहे. बाबा सहानी यांच्या आत्महत्येतील आरोपीशी उद्धव ठाकरे यांचा व्यावसायिक संबंध असल्याची शक्यता? निरुपम यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर उबाठाला नुकताच निवडणूक आयोगाने देणगी स्वीकारण्यास परवानगी दिली, मग गुप्तासोबत भेट ही निवडणूक निधीसाठी होती का? असा प्रश्न निरुपम यांनी विचारला.

कोण आहेत गुप्ता बंधू ?

अजय गुप्ता आणि अतुल गुप्ता हे देहरादून येथील सचिंदरसिंग सहानी (बाबा सहानी) यांच्या हत्येप्रकरणी आरोपी असून ते सध्या जामिनावर आहेत. सहानी हे १५०० कोटींचे डेहराडूनमध्ये मोठे कॉम्प्लेक्स तयार करत होते मात्र त्यांना पैशांची चणचण होती. २४ मे रोजी बाबा सहानी यांनी इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. यावेळी त्यांच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत गुप्ता बंधूंची नावे होती. तत्पूर्वी बाबा सहानी यांनी १६ मे रोजी देहरादून पोलीसांना पत्र लिहून गुप्ता बंधूंपासून धोका असल्याची तक्रार केली होती.

Source link

dehradungupta brothers scamsanjay nirpum on uddhav thackerayuddhav thackeray delhi duaraउद्धव ठाकरेगुप्ता बंधूदिल्ली दौरासंजय निरुपमसंजय राऊत
Comments (0)
Add Comment